एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.
घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.
एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.
इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.
आजोबा म्हणाले “इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत.”
आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.
Leave a Reply