पण आणि परंतु,
मध्ये सारखे येती,
निर्माण करती किंतू ,
जीवनही ते बिघडवती –!!!
गोष्ट कुठली सरळ ,
आयुष्यात होत नाही,
प्रत्येकाचे त्यांच्यावाचून ,
पदोपदी अडत राही,–!!!
सुख– दु:खांची असो भेळ,
असो अडसर भोवती,
मार्ग नसण्यात निव्वळ
चोख भूमिका निभावती,–!!!
ते नसते तर आयुष्याची,
मग न्यारी नसती कुठली गंमत, त्यांच्याशिवाय भाषा अडतसे, सतत सारखी केव्हाही अविरत,–!
अस्तित्व त्यांचे जन्म देई, आभाळाएवढ्या कर्तृत्वाला, मातीतून वर उठत,
काही स्पर्शती आभाळाला,–!!!
सुखदुःखामधील रेषा,
पण परंतु सदैव आखती, अहंकाराचे पाय कापावया, अविश्रांत ते तयार असती,–!!!
अमर्याद सगळ्या दुःखांची, परिभाषा तिथूनच सुरू होई,
पण परंतु आणखी किंतू ,
शब्द महत्व राखत जाई,–!!!
ते नसते तर जीवनच बेचव, असल्यामुळे किती खोळंबा,? मानत नाही त्यांना मानव,
नीट समजून त्यांचे मर्म बा,–!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply