भेटायाला भीमातीरीं उभ्या विठ्ठलाला
निघे दिंडी पंढरपुरला ।।
ज्ञानदेव, मुक्ता, निवृत्ती
नामदेव, सोपान संगती
सवें तयांच्या, जनी सावता अन् चोखामेळा ।।
भान हरपुनी वारी नाचे
नाम मुखीं पांडूरंगाचें
टाळमृदुंगांसंगें वाजत एकतारि-चिपळ्या ।।
नेत्रांपुढती रूप मनोहर
उभें कटीवर ठेवुनिया कर
गळ्यात खुलते हंलती-डुलती तुलसीची माला ।।
जीवन झालें पांडुरंगमय
नुरलें माया-मोह नि भव-भय
भक्तीतुन मुक्तीप्राप्तीचा पथ हा सांपडला ।।
– – –
(माझ्या ‘ज्ञानियांचा राजा’ या आगामी गीतसंग्रहामधून)
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply