अविरत भक्त करत वारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम्
अथक जन ज़ात विठूदारीं, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
ऊन नि पाउस यांची नाहीं एकाला पर्वा
ध्यास एकची लागे सर्वां – तो विठ्ठल बरवा
भारले सारे वारकरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
कठिण शेकडो मैल तुडवती मराठदेशातले
अखंड नाचत भक्त शेकडो, कुणिही नच दमले
देइ चैतन्य मनां पंढरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
समान असती विठुमार्गावर सारे वारकरी
कुणांशी न कोणांस करावी लागे बरोबरी
सर्वच हर्षद-शेज़ारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
वारकर्यांच्या वसतो हृदयीं पांडुरंग सांवळा
उभा विटेवर, हात कटीवर, तुलसीमाळ गळा
विठूमय झाले नरनारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
ज़ातिपातिचें ना बंधन, ना लहानथोर इथें
शतकांपासुन अशीच वारी पंढरिला निघते
पाहुनी म्हणतो स्वत: हरी – ‘हॅटस् ऑऽऽफ् टु देम्’ ।।
– – –
हॅटस् ऑऽऽफ् टु देम् : Hats Off To Them
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply