पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा जन्म २२ एप्रिल १९६८ रोजी झाला.
सध्या झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको” ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जात होती. त्यात एक गुरुजी कथेच्या सुरुवातीचा भाग विस्तार स्वरूपात सांगत असत. या मालिकेचे सूत्रसंचालन भगरे गुरुजी करत असत. या अगोदर झी मराठी वाहिनीच्या “राम राम महाराष्ट्र” च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून भगरे गुरुजी ‘वेध भविष्याचा’ या सेगमेंटमधून राशी भविष्य सांगताना दिसले. त्यामुळे भगरे गुरुजी सर्वांच्याच परिचयाचे आहेत.
पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी हे त्यांचे पूर्ण नाव नाशिक, पंचवटी येथे त्यांचे स्वतःच्या नावे प्रतिष्ठान आहे.
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री ” अनघा अतुल” ही भगरे गुरुजींची कन्या आहे. अनघाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. परंतु या क्षेत्रात येण्यापूर्वी तिनं पडद्यामागेही महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. अनघानं महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून पाहिलं होतं. तसंच‘अनन्या’ या नाटकामध्ये तिनं अनन्याची मैत्रीण प्रियांका ही व्यक्तिरेखा साकारली होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
माझ्या सौ. मुलीची पत्रिका आ. अतुलशास्त्री भगरे गुरुजींना दाखवायची आहे.त्यांचा व्हॉट्स अप क्रमांक मिळू शकेल का?
कृपया
मला श्री. भगरे गुरुजींना पत्रिका दाखवुन मार्गदर्शन हवे आह तसेच श्री. भगरे गुरुजींचा संपर्क नंबर मिळु शकेल का?
मला माझ्या मुलाची पत्रिका भगरे गुरुजींना दाखवून भविष्य जाणून घ्यायचे आहे कृपया वेळ मिळावी
मावा माझ्या भावाची पत्रिका भगरे गुरुजींना गुरुजींना दाखवायचे आहे त्यासाठी नंबर व ॲड्रेस हवा