नवीन लेखन...

ज्येष्ठ गायक पं.जगन्नाथबुवा पुरोहित

ज्येष्ठ गायक पं.जगन्नाथबुवा पुरोहित हे आग्रा घराण्याचे गवई, बंदिशकार, तबलावादक. पं.जगन्नाथबुवा पुरोहित हे ‘गुणीदास’ या टोपणनावाने बंदिशी करत असत.

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचा जन्म १२ मार्च १९०४ रोजी झाला.

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे उस्ताद विलायत हुसेन खान हे यांचे गुरू.  पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या शिष्यांच्या मध्ये राम मराठे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, जितेन्द्र अभिषेकी, सी.आर्.व्यास, यशवंतबुवा जोशी, वसंतराव कुलकर्णी, लीलाताई करंबेळकर, मनोरमा वागळे, मोहनतारा अजिंक्य, जी.एन्.जोशी, मन्ना डे, आणि तबल्यातील भाई गायतोंडे, नाना मुळे! अशी अनेक दिग्गजाची नावे होती.

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या बद्दला पु.ल देशपांडे म्हणत असत, या साऱ्यांच्या गाण्यातून बुवा सुगंधासारखे भेटतात आणि तो सुगंध फक्त जाणकारांनाच येतो!

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांनी राम मराठे यांना शिकवण्याचा एक किस्सा तबला वादक मा. मोहनराव कर्वे यांना सांगितला होता तो होता,

एके दिवशी मोहनराव रामभाऊंबरोबर बुवांकडे शिकवणीला गेले. दुपारी अडीच तीनचा सुमार. बुवांनी मारव्यातील विलंबित चीज सुरु केली : माई मोहे काहुही कहाॅं परी

ताल आडाचौताल. ठेक्याला बसले मोहनराव कर्वे.

बुवांनी एक उपज काढायची, रामभाऊंनी ती पुरी करायची आणि समेला यायचं. लगेच बुवांनी पुढची उपज काढायची आणि रामभाऊंनी ती पुरी करायची.

हे असं अडीच तीन तास विनाखंड चाललं. तीच चीज, तोच ताल आणि तीच लय!

शेवटी बुवांनी थांबवलं. बुवा उठले, मोहनरावांचे कौतुक केले आणि दमला असशील म्हणत स्वतः खांदे रगडून दिले! खाऊ घातलं आणि आज्ञा केली, राम, जा, याला पुण्याच्या गाडीत नीट बसवून दे आणि परत ये!

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे निधन १९६८ साली झाले.

श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे गायन.

https://www.youtube.com/shared?ci=wO2htNMSaQI

https://www.youtube.com/shared?ci=4v9Orf4pAUU

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..