पाणी म्हणजे जीवन. “पानी बिना जग सुना” असेही म्हणतात. पाण्याशिवाय जगावयाची कल्पनाही पृथ्वीवरील सजीवांना सहन होणार नाही.
ह्या पाण्याची अनेक रूपे आहेत. त्याचे शात्रीय विवेचन आपण करणार आहोत.
- पाण्याचे पहिले रूप : घनरूप पाणी म्हणजे बर्फ.
पाण्याचे तपमान जेंव्हा ४ डिग्री सेन्टी ग्रेड पर्यंत खाली उतरते त्या वेळेस पाण्याचे बर्फात रूपांतर होते व त्याचे आकारमान वाढते. त्यामुळेच बर्फाळ प्रदेशात पाण्याचे पाईप फुटतात हे आपण शाळेत शिकलो आहे.
बर्फ जरी आपल्याला थंड वाटत असले तरी तॊ प्रकृतीने उष्ण असते. त्याची सुप्त उष्णता (latent heat ) ८० कॅलरी/ग्राम एवढी असते. बर्फ हे पृथ्वी वर अब्जावधी वर्षा पासून आहे. अनेक हिमखंडांची इतिहासात नोंद आहे.
बर्फाचे खूप उपयोग आहेत. तापामद्धे बर्फाच्या पट्ट्या कपाळावर ठेऊन ताप उतरतो. लहानपणी आपण आईस्कीम चे गोळे खात होतो. सध्या बर्फाशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या आईस क्रीमची कल्पना ही करता येत नाही.
वैद्यकीय क्षेत्रामद्धे बर्फाचे अनन्य साधारण महत्व आहे. नाकाचा घोळणा फुटला किंवा जखमेतील रक्त थांबवण्याकरता बर्फाचा उपयोग होतो हे आपणा सर्वांना माहित आहे. सध्या कोरोनाचे लसीकरण सुरु आहे. ती लस वाहतूक करतांना किंवा प्रत्यक्ष देई पर्यंत बर्फातच ठेवावी लागते. नाहीतर ती निष्क्रिय होते. कांही इंजेक्शन दूर ठिकाणी पोहचवताना तेही बर्फातूनच पाठवतात.
जनुकीय अभियांत्रिकी मद्धे व वैद्यकीय क्षेत्रामद्धे कांही रासायनिक पदार्थ आयात करावे लागतात. त्यासाठी साध्या बर्फा ऐवजी कोरडा बर्फ (Dry ice) वापरावा लागतो कारण त्याचे तापमान उणे ८० डिग्री सेन्टी ग्रेड असते व ते ६० तास टिकते. त्यामुळे ते रासायनिक पदार्थ तेवढ्या वेळेत योग्य ठिकाणी कोणत्याही प्रकारची हानी न होता पोहचतात.
व शेवटी मद्य प्रिय व्यक्तींना बर्फाशिवाय मद्य ही कल्पना असह्य आहे.
- द्रव रूप :
पाण्याशिवाय सजीव जगू शकत नाही. आपल्या शरीरातील वेगवेगळ्या चयापचय व रासायनिक क्रिया पूर्ण करणेसाठी तसेच रक्तप्रवाह सुरळीत राहावा यासाठी पाण्याची अत्यंत जरुरी असते. प्रत्येक माणसाची रोजची पाण्याची गरज वेगवेगळी असते पण साधारणपणे रोज २-३ लिटर पाणी पुरेसे होते. कांही औषधे ही पाण्यामद्धे सौम्य (dilute) करून घ्यावी लागतात, उदा. कडू काढे, गोळ्या इ.
पाण्याचे उष्णतामान प्रमाणे वर्गीकरण करतात.
अ. थंड पाणी : हे तुमच्या शरीरात उत्साह निर्माण करते. बहुतेक लोक पिण्याकरता हेच पाणी वापरतात.
ब. कोमट पाणी- बरेच लोक कोमट पाणीच पितात. आयुर्वेदात पण कोमट पाणी पिण्याचा सल्ला वैद्य लोक देतात. त्यामुळे शरीराचे व पाण्याचे तापमान समान होते. घसा खराब झाला की डॉक्टर कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करायचा सल्ला देतात. बरेच लोक उष्ण पाण्याऐवजी अंघोळीला कोमट पाणी वापरतात.
क. गरम पाणी : घसा खराब असेल व खोकला असेल तर गरम पाण्याने घसा शेकण्या करता पाणी वापरतात. काही ऍलोपॅथी व आयुर्वेदिक औषधे डॉक्टर गरम पाण्यातून घेण्यास सांगतात कारण उष्णतेमुळे औषधातील रसायने जास्त सक्रिय व परिणामकारक होतात.
ड. उकळते पाणी :
हे अंगावर पडल्यास त्वचेस फोड येतात. त्यामुळे याच्यापासून जपून राहावे. ह्याचा उपयोग किचन मधील बेसिन तुंबले असेल तर ह्यात बेकिंग सोडा घालून ते मोकळे करता येते. इ.
पाण्याचे त्याच्या प्रवाहाप्रमाणे वर्गीकरण करता येते. ओढे, नदी, हे प्रवाही पाण्याचे प्रकार आहेत. विहीर, बंधारे व धरणातील पाणी व समुद्राचे पाणी हे स्थिर पाण्याचे प्रकार होत. गढूळ पाणी पावसाळ्यात असते पण ते कोणी वापरत नाही. धरणातील पाण्यामुळे वीजनिर्मिती होते व प्रजेला वर्षभर शेतीकरिता व पिण्याकरता पाणी उपलब्ध होते. समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे ते योग्य प्रक्रिया केल्या शिवाय वापरता येत नाही. पाण्याचे त्याच्या पारदर्शकते प्रमाणे सुद्धा वर्गीकरण करतात जसे की स्वच्छ, नितळ पाणी. स्वच्छ पाणी शुद्ध असतेच असे नाही. अशुद्ध पाणी हे रोगराई पसरवते. असे पाणी वेगवेगळ्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेने शुद्ध करून पिण्यायोग्य करून घ्यावे लागते. सध्या बाजारात त्यासाठी बऱ्याच प्रकारचे उपयुक्त फिल्टर उपलब्ध आहेत.
- वाफ –
वाफ हे पाण्याचे तिसरे रूप आहे. याचे उपयोग आपल्याला लहानपणापासून माहित आहेत. जेम्स वॅट ने वाफेच्या ताकतीवर आगीन गाडीचे इंजिन चालवून दाखवले. वाफेची शक्ती जास्त असते कारण त्याची सुप्त उष्णता ५६० कॅलरी/ग्राम एवढी असते. त्यामुळेच प्रेशर कुकर मद्धे पदार्थ लवकर शिजतात. बहिणाबाईंच्या कवितेत नमूद केल्या प्रमाणे अशी एक सुद्धा गृहिणी नसेल की तिला संसार करताना चुलीवर, (सध्या) गॅस वर वाफेचे चटके बसले नाहीत. वाफेचे ऊर्ध्वपतन करून पुन्हा पाणी मिळवता येते.
गमतीदार वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे पाण्याच्या ह्या सर्व स्थिती अदलाबदल करता येण्या योग्य आहेत ( Reversible). म्हणजे बर्फाचे पाणी — पाण्याची वाफ — वाफेचे परत पाणी.
या कोरोना काळात वाफ घेण्याचे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित झाले आहे.
— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
Very nice information on the simple topic “पाणी “.The author has written
in very interesting manner!!
Khupach sundar vmahitipurn lekh…