नवीन लेखन...

पन्नाशीच्या उंबरठ्यावर…

नोव्हेंबर चे कालनिर्णय चे पान उलटले आणि चाहूल लागली ती माझा पन्नाशीचा उंबरठा ओलांडण्याची.
Age is जस्ट a number, all is in your mind..
असं अनेकदा ऐकलेलं असतं आणि ते खरं आहे.
तरीही मागे वळून पाहिलं की आपलाच प्रवास आपण कसा केला याचं चित्र समोर उभं राहतं.
अनेक आनंदाचे क्षण, यशाची शिखरे, संघर्ष आणि काय असतं प्रत्येकाच्या आयुष्यात? प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो इतकंच बाकी सुख दुःख असा ऊन पावसाचा खेळ काही जीवनभर सुटत नाही. आपण खेळत राहतो.. कधी जित कधी हार असणार.. असू देत…
पन्नाशी म्हणजे आयुष्यातली लख्ख दिसणारी दुपार.
अनेक अनुभवातून, कर्तृत्व सिद्ध करून आपण उभे असतो.
एव्हाना उन्हाचे चटके सोसण्याची सवय झालेली असते.
आपले कोण, परके कोण याची अनुभूती घेतलेली असते.
कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडे पाहुन जीवनातल्या संध्याकाळची जाणीव रोज होत असते.आपल्या सतत कार्यरत असलेल्या लोकांना थकलेलं पाहणं खुप वेदना देणारं असतं.
त्याचवेळी आपली मुलं यशस्वी होत असतात. त्याचं समाधान असतं.आता थोडी आपली सुखाची परिभाषा बदलललेली असते. दुसऱ्यांना आनंद देत आपण स्वतःचा आनंद शोधत असतो. व्यवहार दूर ठेवत आपण थोडे हळवे होत जातो.
आता कुणाशी बाजारात काही खरेदी करतांना पैसे कमी करा यासाठी भांडत नाही की कुणाला फार उपदेशाचे डोस ही देणं योग्य समजत नाही. जीवन हा ज्याचा त्याचा प्रवास.. तो प्रत्येकाचा वेगळा हे पटलेलं असतं.
येणाऱ्या संध्याकाळची तयारी दुपारीच केली की
संध्याकाळ रम्य होते.दिवे लख्ख स्वच्छ करायचे. त्यातली तेल, वात, आणि सोबत समाधानाचे अत्तर जागेवर आहे ना?सगळं ठीक आहे का हे बघून ठेवायची असते ती दुपारीच..
कधी सोनपावलानी कातर वेळ येईल तेंव्हा आपणच आपले आनंदाचे दिवे लावायचे असतात. आणि कृतज्ञतेच्या अत्तराने गंधित व्हायचे दिवस येणार असतात.
सोबत कुणी असेन. नसेन.. माहीत नसतं. आयुष्याची रेषा पुढे जात असतेच…
कारण प्रत्येकालाच मालकंस आळवायचा असतो पण भैरवीची चाहूल नकळतपणे मनात असतेच ना?
फार सेंटी बिंटी लिहिण्याचा माझा उद्देश मुळीच नाही. परवा डॉ. कडे गेलो म्हटलं बघा दिवाळीच्या गोडा धोडानी जरा दोन चार किलो वाढलंय (वजन ). बीपी गिपी, शुगर चेक करा. डॉक्टर निर्वीकार.
बसा. नाव, वजन नोंदी केल्या, वय म्हटलं 50,
काय? त्यांचा प्रश्न.
म्हणजे? जास्त वाटलं का?
No मला वाटले 40 असेन!
माझ्या अंगावर पुन्हा मूठभर मास चढलं.
सगळं नॉर्मल आहे. साखर 105 म्हणजे ओक्के.
पण वजन जरा कमी करा बरं.व्यायाम वाढवा.
नक्कीच! असं म्हणुन मी परतलो.असो…
जगण्याचं नवे भान पन्नाशी देते.
कुणी uncle, सर, काका, दादा काही म्हटलं तर छान स्माईल द्यायचं…
रफी लता यांच्या गाण्यासोबत अर्जितला पण ऐकायचं..
पुरणपोळी सोबत पिझ्झाचा बाईटपण घ्यायचा…
मंदिरात सोवळं आणि सिंगापूरात जीन्स वर मिरवायचं..
रोज नवीन काहीतरी वाचायचं.. जुन्या मित्रांना बोलायचं..
पैश्यापेक्षा आनंद कमवायचा..
असेल तो पैसा जरा जपून वापरायचा..
बाकी इन्शुरन्स बक्कळ काढुन ठेवायचा..
स्वतःला आणि जोडीदाराला नाही दुखवायचं..
पुन्हा तारुण्यात जायचं..
रोज मोगरा तिच्या केसात आणि
सुख आपल्या ओंजळीत साठवायचं..
दुखावलं असेन कुणी आपल्याला त्यांना मनापासून माफ करायचं..
काहीच मनात नाही ठेवायचं.
रोजच सकाळी मनाची पाटी स्वच्छ करायची..
नवे अनुभव त्यावर लिहायचे.. संध्याकाळी वाचायचे,
भरून आले डोळे तर थोडं मोकळं व्हायचं…
आपलं आनंदाचे झाड रोज नव्याने बहरत ठेवायचं..
आलेला क्षण देवाचा प्रसाद म्हणायचा आणि गोड मानायचा..
बघा आयुष्य तेजाळणार हे नक्कीच…
गद्धे पंचविशी,चाळीशी झाली आणि आता साठी बुद्धी नाठी होण्याअगोदर पन्नाशीत एवढं जमलं तरी पावलो बुवा!
म्हणजे जिंदगी लंबी नही उंची होनी चाहिये असं पटतं!
Lots of Love to All…..
ता. क. हे मी सर्व सवाई महोत्सव ऐकताना लिहतोय..

अभिजीत कोळपे
चिंचवड पुणे 33
फोन 7350005813

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..