एक अत्यंत पौष्टिक तसेच असणारी जीवनावश्यक गोष्ट म्हणजे पपई. पपईत काय नाही? पपईचे अनेक फायदे असतात. तसे पाहिले तर १६व्या शतकात मलाया या देशातून भारतात पपईचे फळ आहे. तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल वगैरे या राज्यात प्रामुख्याने पपईची लागवड होते. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचा उत्पादनाचा बाबतीत आठवा क्रमांक लागतो.
पपईच्या पिकापासून कमी वेळात तसेच कमी खर्चात बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. आणि या कारणाने देशात या पिकास कमी अवधीत अधिक लोकप्रियता मिळाली. पपईच्या झाडापासून जवळजवळ वर्षभर फळे मिळतात. तसेच कमी अवधीत पीक घेणे शक्य असल्यामुळे हे अंतरपीक म्हणून घेता येते. प्रति हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन केळीच्या खालोखाल पपईचे उत्पादन मिळते. पपईची फळे चवीला चांगली असून तसेच आरोग्याला पोषक आहेत.
पपईचे विविध गुणधर्म आहेत. बद्धकोष्ठता, अपचन, मूळव्याध, यकृत, प्लीहाचे विकार,त्वचारोग तसेच डोळ्यांचे विकार इत्यादी सर्व गुणकारी उपयोग आहेत. कच्चा पपई फळापासून मिळणाऱ्या चिकाचा (पापेन) उपयोग बिअर कारखान्यात वापरता येतो. पपईच्या फळापासून जाम, जेली, टुटीफ्रुटी इत्यादी पदार्थ तयार करण्यात येतात.
– मदन देशपांडे
Leave a Reply