नवीन लेखन...

गुणकारी वनस्पती जेष्ठमध !!

Papilionaceae - A plant with Ayurvedic Importance

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये लाखो वनस्पतींचा वापर होत आला, परंतु पाश्चात्य एलोपेथिक औषधांच्या भडीमाराने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला गेला. भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे, भारताची अर्थव्यवस्था ही शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. पारंपारिक पद्धतीने केला जाणारा कृषिव्यवसाय आज आधुनिकतेकडे झुकलेला दिसतो. यांत्रिक शेती-अवजारांच्या वापराबरोबरच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भारतीय शेतीत उत्पन्नाचे प्रमाण वाढत असले तरी, जागतिक मुक्त अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने व्यावसायिक स्वरूप देणे आवश्यक आहे.

विज्ञानाच्या प्रगतीबरोबर आजारांचेही प्रमाण वाढले, त्यामुळे औषधांची मागणी वाढली. आवश्यकते ऐवढे औषधी-वनस्पतींचे उत्पादन होत नसल्याने औषधांचा मोठ्या प्रमाणत काळाबाजार होत आहे. पर्यायाने ग्राहकांची फसवणूक होते. ह्या सर्व बाबींचा विचार केल्यास औषधी-वनस्पतींच्या शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

औषधी निर्मितीमध्ये जेष्ठमध या वनस्पतीची, भारतातील मागणी उत्पादनापेक्षा जास्त असल्याने दर वर्षाला दहा ते बारा हजार टन जेष्ठमध आयात करावा लागतो. जेष्ठमधाचे उत्पादन वाढविल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता लाभेल तसेच परकीय चलनही वाचविता येईल. जेष्ठमधासंदर्भात प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पुढील उल्लेख आढळतात –

१) ” यष्टी हिमा गुरुः स्वाव्दी,चक्षुष्या बलवर्णकृत् |
सुस्रीग्धा शुकला केश्या स् वर्या पित्तानिलास्राजित् ||
ब्रणशोथविषच्छर्दी तृष्णाग्लानिक्षयापहा | ” (भावप्रकाश)

२) ” या वेदना शश्त्रानिपातजाता त्रीव्र शरीरं प्रदुनोतिजन्तोहः |
घृतेन स शान्ति मुपैति सिक्ता कोष्णेन यष्टीमधुकान्वितेन् || ” (सुश्रत)

असे विविध उल्लेख असलेल्या ह्या वनस्पतीची नवे पुढीलप्रमाणे आहेत –

कुळनाव – Papilionaceae,

शास्त्रीय नाव / Latin Name – Glycyrrhiza Glabra Linn,

संस्कृतनाव – मधुयष्टिका, यष्टीमधु, मधुक, मधुरस

मराठी नाव – जेष्ठमध, जेष्ठीमध

हिंदी नाव – मुलेठी, मधुयष्टिका

English Name – Liquorice root

पाच ते सात फुट वाढणारे जेष्ठामधाचे वृक्ष बहुवर्षीय असून, दोन ते तीन वर्षे उत्पादण देते. ह्याच्या मुळांचा औषधी निर्मितीत उपयोग होतो, जास्तीत-जास्त वनस्पती विदेशातून आयात केली जाते. ह्या वनस्पतीला उष्ण व समशीतोष्ण हवामान उपयुक्त असते, फेब्रुवारी किवा जुलै महिन्यात जेष्ठमधाची लागवड केली जाते.

रासायनिक घटक – जेष्ठमधाच्या मुळांमध्ये ग्लेसराईझिन व ग्लीसराईजीक एसिड असते, तसेच सुक्रोज, ग्लुकोज, स्टार्च, वसा, प्रोटीन, डेक्स्ट्रोज, रेझिन, अस्पराईजीन, इस्ट्रोजेन आणि एक उडनशील तेल असते.

गुणधर्म – वात-पित्तशामक, कंडूघ्न, चर्मरोग नाशक, केश्य, शोथहर, कंठ्य, चक्षुष्य, शुक्रवर्धक, बल्य, ज्वरघ्न, आदी गुणांनी युक्त.

उपयोग – डोकेदुखी, नेत्रविकार, स्वरभंग, सर्दी, खोकला, अल्सर, घसा व घशाचे रोग, पोटाचेविकार, श्वासनलिका विकार, तृष्णा विकार, हृदयरोग, अपस्मार, दुग्धवर्धन (दुध वाढीसाठी), यकृत विकार, शुक्र वाढीसाठी, हिचकी (उचकी), रक्त वमन, लघवीचे विकार, उन्हाळी, रक्त विकार, प्रदर, रक्ताची कमतरता (अनिमिया), पार्किनसन्स, मज्जातंतू विकार, क्षय, रक्तमुळव्याध, जखम, फोडे फुन्सी अशा विविध आजारांवरील औषधी निर्मितीत जेष्ठमधाचा वापर होतो.

याशिवाय अन्नपदार्थ, पानमसाला, तंबाखू, चाकलेट व तत्सम पदार्थ तसेच बियर ह्यांना गोडी निर्माण करून स्वादिष्ट बनविण्यासाठी जेष्ठमधाचा वापर होतो.

अशी बहुउपयोगी असलेले ही वनस्पती शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी वरदान ठरणारी आहे. सावलीत वाळवलेल्या जेष्ठाधाच्या मुळ्या १०० ते १५० रुपये प्रती किलो दराने बाजारात विकल्या जातात, ह्या वनस्पतीचे दर एकरी २० ते २५ क्विंटल एवढे उत्पादन मिळते. लागवड करण्यासाठी ‘ हरियाणा मुलहटी नंबर-१, एम.एच.-१, इसी-२१९५० ह्या जाती उपयुक्त आहेत.

आयुर्वेदाची अशी अप्रतिम देणगी असलेली ही वनस्पती भारतीय शेतकऱ्यांना नवसंजीवनी ठरू शकते.

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, ‘भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत. महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे. प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करायोगच ठरेल.

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

7 Comments on गुणकारी वनस्पती जेष्ठमध !!

  1. अतिउत्तम उपयुक्त माहिती दिली आहे असेच आयुर्वेदिक बहुगुणी औषधी गुणधर्म व त्याचा वापर कसे करावे हे विस्तृतपणे सहज उपयोग करुन आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घेणे सुलभ होईल
    धन्यवाद

  2. जेष्ठ मध् या विषयी खुप महत्वाची माहिती आपल्या लेखातून मिळाली
    धन्यवाद

  3. जेष्ठमधवारिल आपला लेख खुप छान वाटला . जेष्ठमधाचे फायदे तसेच तोte आपण मला सांगू शकाल का ?

  4. नमस्कार.
    ज्येष्ठमधाबद्दलचा लेख इंटरेस्टिंग आहे.
    # भारत व चीन येथे ज्येष्ठमधाचे महत्व आहेच. पण, पाश्चिमात्य देशांमध्येही ते कळू लागलेले आहे.
    #मार्च २००६ चे ‘नॅशनल जिऑग्रॅफिक’ मासिक काय म्हणते ते पहा : One team found that glycyrrhizic acid, a compound in Licorice (याचा उच्चार लिकरिश असा होतो, व हे ज्येष्ठमधाचे पाश्चिमात्य नाव आहे) , kills cells infected with the virus that causes Kaposi’s Sarcoma ( हा एक प्रकारचा कॅन्सर आहे).
    # मी कॅन्सरद्दल बर्‍याच इंग्लिश पुस्तकांचे परिशीलन केले आहे, व त्यातील अनेकांमध्ये लिकरिश म्हनजे ज्येष्ठमधाचे महत्व सांगितलेले आहे. Alternate Medicine मध्ये, त्याचे विशेष महत्व त्या विषयातील पाश्चिमात्य प्रॅक्टिशनर्सही मानतात.
    स्नेहादरपूर्वक
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..