संथ झुळझुळणारी सरिता
किनारी जलझरे वाळवंटी
विराट! वटवृक्ष पारावरती
साक्ष आजही अनादीकाली.
अदृश्य घुटमळणारे आत्मे
भिरभिरती मोक्षमुक्तीसाठी
कर्मकांडांत, गुंतलेले जीव
कल्लोळ तो मायापाशांचा
काहूर! अंतरात आठवांचे
अंती तिलांजली आत्म्याला
प्रघात! सारेच केविलवाणे
अखंडित झुळझुळते सरिता
संस्कार सारेच मोक्षासाठी
भावकल्पनांच्याच श्रद्धा!
केवळ, सांत्वन मनामनांचे
अखंड प्रवाहपतीत सरिता
जन्मी! उलघाल जीवाची
धडपड सारी केविलवाणी
दोर प्रारब्धाचा दयाघनाचा
सत्य! श्वासांची पराधिनता
— वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. ५.
५ – १ – २०२२.
Leave a Reply