नवीन लेखन...

आमूलाग्र बदल (Paradigm Shift)

प्रस्थापित बाजारपेठेच्या कलाला ओलांडून /वळसा घालून स्पर्धेला तोंड देणे दिवसेंदिवस व्यवसायांसाठी अवघड होत चाललं आहे. सगळं काही पूर्वापार रिवाजानुसार चालत राहील, हे बदल तात्पुरते आहेत आणि पुन्हा जुन्या पद्धतीने व्यवसाय करता येईल या भ्रमात व्यावसायिक, व्यापारी आणि अगदी कर्मचारी देखील आहेत.

कोविड -१९ ने या विचारसरणीला दिलेला हादरा अजूनही लोकांच्या पचनी पडत नाहीए. काही व्यवसायांनी हे अचूक हेरले आणि त्यानुसार स्वतःमध्ये तातडीने बदल केले. काहीजण मात्र अजूनही २०१९ पूर्वीच्या परिस्थितीची वाट पाहात निवांत बसले आहेत. लॉकडाऊन नंतर कर्मचारी आणि ग्राहक जुन्या वळणावर येतील आणि व्यवसाय पूर्वीसारखा सुरु होईल याची अजून काहीजण प्रतीक्षा करताहेत.

मार्क झुकेरबर्ग ने काही दिवसांपूर्वी ” कॅपिटल एफिशिअन्सी ” ( Capital Efficiency) हा वाक्प्रचार बाजारात टाकला. बाजारपेठेतील वृद्धी, नफा या गोष्टी बऱ्याचजणांनी गृहीत धरल्या. पण प्रत्यक्षात असे होताना दिसले नाही. सध्याच्या नफ्यापेक्षा भविष्यकालीन मिळकतीकडे गुंतवणूकदारांचे अधिक लक्ष होते. (आठवा बँकांमधील व्याजदर) पण आता व्याज आणि गुंतवणूक यांचे व्यस्त प्रमाण दिसतेय. गुंतवणूकदारांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत ,त्यामानाने उधारीचा कल घटतोय. म्हणून ज्या व्यवसायांमधून नफा दिसत नाहीए त्यामध्ये पैसे गुंतविण्याची जोखीम घ्यायला कोणी तयार नाही.

जेव्हा लाटा अचानक दिशा बदलतात,तेव्हा जहाजाला तरंगत राहणे अवघड होत जाते.

हा आमूलाग्र बदल किती काळ टिकेल शंका आहे. पण तोपर्यंत व्यवसायांनी दृश्य वाढीपेक्षा नफा होईल अशा वृद्धीकडे लक्ष देणे संयुक्तिक ठरेल. कर्मचाऱ्यांनीही कौतुकापेक्षा, पगारवाढीपेक्षा नोकरी गमावण्याच्या जोखमीकडे लक्ष द्यायला आहे. जागतिक मंदी हाकेच्या अंतरावर आहे असे सगळ्यांना जाणवतेय. हातची स्थिर नोकरी सोडून जोखीम असलेल्या संधीचा पाठलाग तूर्त करू नये. लोकांना थांबविण्यासाठी पगारवाढीचे सत्र सुरु करणाऱ्या कंपन्यांची बोटे आता भाजली आहेत. आणि सगळीकडे लेऑफ, कर्मचारी कपात सुरु झालीय.

बदल नेहमी आपल्या भल्यासाठीच होत असतो म्हणून वर्तमानावर नजर ठेवून बदलण्याची तयारी सर्वांनी (व्यावसायिकांनी आणि कर्मचाऱ्यांनीही) ठेवावी.

वॉरेन बफेट म्हणतो – “Only when the tide goes out, you discover who’s been swimming naked.”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..