पराकोटीच्या दुःखाला
नजर व्यसनाची
जिथे कारणे व्यसनचं
कोण वाचवी
दाम दुप्पट पैसा
विनाकारणे वाहती
दुष्ट दुर्जन तेथे
उगाच नाचती
अर्थ-
“”ह्या quarantine समस्ये मूळे खूपच वांदे झालेत. जीवनावश्यक गोष्टी मिळणं किती कठीण झालंय.””
“” कठीण? काही बोलू नकोस, मिळतंय की सगळं, रोज, घराच्या बाजूला.””
“” काय मिळतंय? तंबाखू कुठे मिळत्ये. किती दिवस झाले पुरवून पुरवून खातोय. कोरोना झाला तरी चालेल पण तंबाखू न मिळाल्या मूळे मेलो अस नको व्हायला.””
सध्या आजूबाजूला हेच ऐकायला मिळतंय. एनर्जी बुस्टर च्या नावाखाली मनाला खिळवुन रहाणाऱ्या काही विक्षिप्त सवयी कधी सुटतील हा एक प्रश्नच आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दारुची दुकाने उघडा, घरात कंटाळा आलाय म्हणून आता दारुची दुकाने उघडा या गोष्टींना काही अर्थ नाही. मुळात 21 दिवस एखादं व्यसन केलं नाही तर ते सुटतं या संकल्पनेलाच काही अर्थ नाहीये. आज पर्यंत अशा वेळा कधींच कोणावर आल्या नसतील असे होणारच नाही. पण जोपर्यंत मन मानत नाही, मन ठरवत नाही तो पर्यंत ती क्रिया थांबणं अशक्य आहे.
अशाने होतंय काय? जो विक्रेता आहे त्याला दसपट फायदा होतोय पण आपलं शरीर जे भोगतय त्याचे काय? त्याला फायदा कधी करून देणार तुम्ही?
मला व्यसन केल्याने समाधान मिळते. म्हणजे नक्की काय मिळतं? मग तीच गोष्ट प्रपंचात करा, भगवंताच्या नामात करा, त्यात जास्त समाधान मिळणं हे चांगले नाही का?
मेडिक्लेम आहे म्हणून काही करावे अन मग घरच्यांनी भरावे त्याचे ऋण असे का?
विचार व्हायला हवा नाहीतर, मंदिरा समोरच्या रांगा वाइन शॉप समोर जायला वेळ लागणार नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply