रुक्या टक्यात मोजावा
तो काळ आता सरला
डोलरात बाळ सांगे
किती रुबाबे मजला
आमी येडे नि बावळे
करे त्याचा फुगीर आकडा
रुपयात किती भेटे
याचा हिशेब हा एवढा…
तरी वाटे बरे आहे
माझा लेक परदेशात
सांगतो मी अभिमाने
नाणं खणखणीत माझं
पण खरं सांगू वाटे
इथे हवे रे कुणी बाळा
पैसा कामी येतं नाही
पुरे क्षण तो जिव्हाळा
तू लाख जरी बोलवे
ही माती सांगे नाळ
पाय अडकून राही
उंबऱ्यात काही काळ
आता सोड तुही हेका
तू तिथे मी इथे आहे बरा
उगा दोष देत नाही
माझ्या गुणाच्या तू लेका
कधी वाटे पुन्हा यावे
परतुनी माय देशी
एक ओंजळ वाहाशी
आई बा च्या स्मृतीपाशी!!
— वर्षा कदम.
Leave a Reply