पारिजातकाची फुले आम्ही, विसावलो या डहाळीवर,
फुलण्या सगळ्या अंगोपांगी, कळीकळीने केला कहर, –!!!
जगणे असावे लोभसवाणे,
सुंदर आणि कसे निशांत,
पाहून आमचा असा बहर,
माणूस होऊन जातो कृतार्थ,
रंग पांढरा आमुचा शांतीचा, त्याखाली देठ रक्तरंगी,
पाकळ्या फुलल्या चहूबाजूच्या, सौंदर्य ओसंडे विविध ढंगी,–!!!
असे किती असावे जगणे,
फार नाही, आम्ही अल्पायुषी, तरीही आम्ही फुलत राहतो,
मानत त्यात खरी राजीखुशी,-
पहाटवेळी होते पखरण,
फूल एकेक करुन ढळते,
संगत आमुची सोडून जाती, भाईबंद बघा ना , कायम ते,–!!!
नाही दु:खी आम्ही त्यावरून, जगणे सारे जगां अर्पियले,
आरक्त आम्ही मोहक संन्यासी, करत विरक्तीचेच मार्ग खुले,–!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply