परीक्षण साध्य करुनी
नवा अध्याय रचावा
सुचविल्या उपाय मग
कसला अहंकार नसावा
अहंकार असती मना
ग्रह दूषित होतो
जवळ कोणी असलेला
उगीच लांब जातो…
अर्थ–
परीक्षण साध्य करुनी, नवा अध्याय रचावा, सुचविल्या उपाय मग, कसला अहंकार नसावा
(अभ्यास असो किंवा आयुष्य त्यातून सतत शिकणाऱ्याला नवीन गोष्टीना आपलंसं करता येत असतं. त्यातून आपल्या मनात येणाऱ्या अनेक कल्पना या पुढे विस्ताराने एका कृतीत येणं चांगलंच पण जर त्यात कोणी सल्ला दिला किंवा उपदेश केला तर त्याचा राग न धरता त्यावर विचार करणं केव्हाही चांगलं. शेवटी ऐकावे जनाचे करावे मनाचे या प्रमाणेच जगलं पाहिजे पण जिथे सल्ला घेणं योग्य तिथे तो नक्कीच घ्यायला हवा.)
अहंकार असती मना,ग्रह दूषित होतो,जवळ कोणी असलेला,उगीच लांब जातो..
(मला सांगणारा तू कोण? मला कळतं, मला शिकवू नकोस, स्वतःच बघ मग मला सांग, या सारख्या वागण्याने कोणी खरंच चांगले सांगत असेल तरी त्याला ते न सांगणे सोयीचे वाटून नुकसान आपलेच होते. शिवाय मी पणा पोटी माणूस दुरावणं या सारखी दुर्दैवी हार नाही जगात.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply