नित्य नेमेची पावसाळा
पुन्हा हिवाळा उन्हाळा
परिवर्तन नियम सृष्टीचा
विविधतेचा गोतावळा
।।१।।
विविधतेचा गोतावळा
परिवर्तित होतो डोलारा
फुलताच लतिका साऱ्या
जिथे तिथे फुले फुलोरा
।।२।।
जिथे तिथे फुले फुलोरा
तंत्रज्ञानाने जीवन बदला
जुने असतेच सोने हो
नव्यात हिरा असे दडला
।।३।।
नव्यात असे हिरा दडला
म्हणून जुन्याचा हट्ट सोडा
परिवर्तनात हित साधा
जुन्या बरोबर नविन जोडा।।४।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply