पर्जन्य काळी व्यवस्थापन
भार घ्यावा निसर्गाचा आपण
उत्कृष्ठ असावे नियोजन
शरीराचे!!
अर्थ–
पावसाळा सुरू झाला की निसर्गाला सौंदर्य प्राप्त होते. ठिकठिकाणी निसर्ग खुलून जातो, हिरवीगार वनराई फुलू लागते, फुलांच्या गालिच्यांनी धरती परत एकदा आपलं शरीर मुक्तपणाने सजवते पण त्यास माणूस एक संधी म्हणून त्याची ओढ आपल्या तुंबड्या भरण्यासाठी करून घेतो आणि पावसाळा मृत्यूचे द्वार उघडायला कारणीभूत ठरतो.
समर्थांनी बाग प्रकरणात फार अमूल्य असे व्यवस्थापन आखून दिले आहे या निसर्गाला आपलंसं करण्याचे. आपण पावसाळ्यात निसर्ग त्याच्या कलेने जर स्वीकारला तर त्यापेक्षा जास्त सुख दुसरं काही नसेल.
आणि या ऋतूत आपलं शरीरही नीट ठेवणं फार महत्त्वाचं असते. काय खावे काय खाऊ नये, काय प्यावे काय पिऊ नये याची काळजी घेतली की कोणताही विषाणू आपल्याला क्षीण बनवू शकणार नाही. तेव्हा काळजी घ्यावी सर्वांनी. जलधारा या आपल्याला जगायला कारण आहे त्यास शेवटाला घेऊन जाण्याचे धाडस न केलेलेच बरे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply