पर्जन्ये कारणे सिंधु
परी शक्य नाही एक हाती
डोंगरांस साथ घेऊनी
ही सृष्टी बहरते
अर्थ–
क्षितीजाच्या पलीकडे जाऊन वाहणाऱ्या सिंधु चे म्हणजेच समुद्राचे गुणगान गावे तेवढे थोडेच. पृथ्वी वरचा 70% भाग पाण्याने व्यापलेला असल्याने त्याचा शिवाय ही पृथ्वी टिकू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. पण त्या समुद्राला आपल्या व्यापाचा गर्व होत नाही हे महत्वाचे. कारण त्यास ठाऊक असते की जमीनी शिवाय आपले अस्तित्व हे टिकून रहाणार नाही. अखेर म्हणताना भूतलावरील पर्जन्यसृष्टी असेच म्हटले जाते.
जीवसृष्टी ही एकमेकांवर आधारलेली असून तेथे कुरघोडी करून चालत नाही. तसेच माणसाच्या आयुष्यातही पर्जन्यमान सतत चालू रहाण्यासाठी डोंगर दऱ्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचे अस्तित्व जसे सिंधुस नाकारून चालत नाही तसेच मोठ्या लोकांना छोट्या लोकांचे अस्तित्व झिडकारून चालत नाही.
सिंधुस येई कंटाळा जर, तर पर्जन्ये कठोरपण, रेवा जाई सुकुनी त्याने, आयुषमान कैसे
— सुमंत परचुरे.
Leave a Reply