पुण्यपावन हे दत्तधाम
कृष्णाकाठी, भक्तीचे
त्रैलोकी शाश्वत कृपाळू
स्वर्गद्वार ते मोक्षमुक्तीचे।।
निश्चिन्ततेच्या महासागरी
दर्शन आगळेच पंचत्वाचे
दत्तगुरू, अखंड कृपाळु
माहेर लडिवाळ गुरुकृपेचे।।
तृप्तीचे श्वास तिथे निरंतर
मनी कारंजे श्रद्धाभक्तीचे
जीवास नाही, घोर चिंता
ध्यास मनहृदयी विरक्तीचे।।
मन ब्रह्मानंदी विरुनी जाते
सत्य, दर्शन होते आत्म्याचे
परमात्मा! तो परमकृपाळु
रूप! भवसागरी दत्तकृपेचे।।
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ४३.
११ – २ – २०२२.
Leave a Reply