नवीन लेखन...

परमेश्वर कुठे आहे?

 

एकदा मी भगवानांना विचारलं, ‘‘भगवान, परमेश्वर तुम्ही कधी पाहिलाय का? तो कसा दिसतो? कसा असतो? की तुम्हीच परमेश्वर आहात?’’ भगवान म्हणाले, ‘‘तूसुद्धा परमेश्वराचा अंश आहेस. परमेश्वराचं प्रकटीकरण वेगवेगळं असेल, त्याचा आविष्कार वेगळा असेल. तुझ्यातला परमेश्वर सजग असेल तर तुला परमेश्वराचं दर्शन होणं हे काहीच कठीण नाही.

तो पाहणं आणि त्याला ओळखणं महत्त्वाचं. आता आपण बसलो आहोत त्या दालनात वीज आहे, विजेची उपकरणं आहेत आणि बटनंही आहेत. एक बटन दाबलं की दिवा लागतो, दुसर्या बटनानं फॅन लागतो. ही ऊर्जा आहे हे आपल्याला माहीत असतं, त्यामुळंच वीज आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण विजेच्या उघड्या तारेला हात लावून पाहत नाही. या खोलीत हवा आहे, हे तुला वेगळं सांगावं लागत नाही. ती आहे म्हणून आपण जिवंत आहोत, हे आपल्याला माहिती असतं. त्याप्रमाणंच परमेश्वराचं आहे. त्याचं अस्तित्व स्वीकारलं वा नाकारलं, तरी तो आहे किवा नाही असं होत नाही. तो आहे ही श्रद्धा आणि तो नाही हीही श्रद्धाच, त्यामुळं त्याच्या अस्तित्वावर काहीच परिणाम होत नाही.’’ भगवान मला

 

परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल सोपेपणानं सांगत होते; पण माझ्या चेहर्‍यावरच्या भावना त्यांच्या लक्षात आल्या असाव्यात. ते म्हणाले, ‘‘तू रस्त्याच्या कडेला मित्रासमवेत गप्पा मारत उभा आहेस. गप्पा रंगल्या आहेत. एवढ्यात मित्राला काहीतरी आठवतं. तो जवळच्या एका दुकानाकडे जायला निघतो. तू त्याच्याकडे पाहत असतोच. त्याच वेळी दुसर्‍या दिशेनं एक मालट्रक अत्यंत वेगानं येत असतो. ट्रकचालकाचा गाडीवर ताबा राहिलेला नाहीये. ते त्याच्याही लक्षात आलंय; कारण क्षणात तो ट्रकमधून उडी टाकतो. आता ट्रक कोणत्याही आणि कोणाच्याही नियंत्रणात राहिलेला नाही. कुठं पळावं, कसं पळावं याचा विचार मनात येईपर्यंत तो ट्रक अशा अंतरावर आलाय की पुढच्या क्षणी तो तुला धडक देऊन पुढे जाणार आहे.

एवढ्यात एक धक्का बसतो तुला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात आपण ढकलले जातो आहोत, एवढंच जाणवतं तुला. क्षणभरात हातापायाला खरचटल्याच्या जखमा सावरत तू उभा राहतोस. तो ट्रक तसाच रोरावत पुढे गेलेला असतो. जवळच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडावर तो आदळतो आणि मोठा आवाज करीत कोसळतो. त्या आवाजानं तुझा दूर गेलेला मित्र धावत तुझ्याकडे येतो. खड्ड्यातून सावरणार्‍या तुला पाहून तो सुखावतो. तुझ्याजवळ धावत आलेल्या एका माणसाकडे तो जातो. तो शांतपणे उभा, निर्विकार. काहीही विशेष न केल्यासारखा. तुला कळतं, हाच तो, यानंच आपल्याला खड्ड्यात ढकललं. तू म्हणतो, ‘धन्यवाद! अगदी देवासारखा आलास. तू धक्का दिला नसता तर त्या ट्रकखाली माझा चेंदामेंदा झाला असता.’ तो देवासारखा माणूस शांत. ‘तू ठीक आहेस ना?’ त्याचा प्रश्न. त्या माणसाला आपण देवासारखा म्हणतो; पण तो तर परमेश्वरच ना? तो माणसाच्या रूपात आहे एवढंच.’’

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..