जीवनभर घासुन घेतल्यावर
आता म्हणता चंदन आहे |
दूर व्हा दष़्टांनो, तुम्हाला
माझं वंदन आहे || १ ||
आता नाही मला कधी
चंदन व्हायचं |
सहाणच होईन बरी
मला नाही झिजायचं || २ ||
एक एक पान काढलंत
फांदी सहित ओरबाडून |
व़क्ष झाला पर्णहिन तेव्हा
चित्र काढता रेखाटून || ३ ||
आता कुठला राग नाही
लोभ नाही उरला |
स्थानक येण्याआधीच माझा
प्रवास होता सरला || ४ ||
— चंदाराणी कोंडाळकर
Leave a Reply