नवीन लेखन...

पद्य आणि मृत्युविचार : भाग – १/११

पार्श्वभूमी :

गेल्या कांहीं काळात, माझ्या कांही जवळच्या व्यक्ती ( near & dear ones ) निवर्तल्या. त्या निधनांमुळे माझा मृत्यूशी जवळून संबंध आला. मृत्यू हें चिरंतन सत्य असलें तरी, जेंव्हां आपण तरुण असतो तेंव्हां मृत्यू आपल्याला दूर-दूर वाटतो व त्यामुळे ; तसेंच, आपण worldly affairs मध्ये गुंग असल्यामुळे ; मृत्युविचार आपल्या मनात सहसा येत नाहीं, आणि आलाच तरी seriously येत नाहीं. पण जसजसें वय वाढत जातें , आणि जवळच्या व्यक्ती ‘नाहींशा’ होत जातात, तसतसा मृत्युविचार आपल्या मनात अधिकाधिक येतो. अर्थात्, याचा असा अर्थ नव्हे की आपण त्या विचारानें लगेच overwhelm किंवा भयग्रस्त होऊन जातो. मात्र, जवळच्या व्यक्तींच्या चिरविरहाच्या विचार मनांत येतोच.  ‘प्रिय असलेला एक एक जण । या जगताला जातो सोडुन । त्यासंगें निज-अस्तित्वाचा एक एक कण जातो ’ . (या माझ्याच ओळी). त्याव्यतिरिक्त, आपण मृत्यूबद्दल ‘दार्शनिक’ ( philosophical ) विचारही करूं लागतो. तत्वज्ञानी लोकांनी व संतांनी, ‘मी कोण’ (‘कोऽहम्’) , ‘कुठून आलो’, ‘कुठें जाणार’ अशा प्रकारचें प्रश्न उपस्थित केलेले आहेत, व त्यांना आपापल्या परीनें उत्तरेंही दिली आहेत.

वाढत्या वयामुळे आणि जवळच्यांच्या Loss मुळे, मी ‘मृत्यू’ या विषयाकडे ओढला गेलो. त्यामुळे, मी स्वत: आपोआप या विषयाला साहित्याच्या अंगानें ,खास करून काव्यरूपात ,  approach केलें. त्यानंतर कांहीं काळानें,  , विविध भाषांमधील जुन्यानव्या कवींनी मृत्यूबद्दल काय लिहिलें आहे, त्यांचा काय-कसा approach आहे , याबद्दल मनात कुतुहल निर्माण झालें , व त्या जिज्ञासेपोटीं कांहीं वाचन-मनन-चिंतन केलें.  त्या मंथनातून मिळालेली कांहीं माहिती मी share करत आहे.

मृत्यू हा जीवनाशी-संबंधित  इतका मूलभूत विषय आहे की, साहित्यात त्याचा उल्लेख वारंवार येतोच. त्याचा अल्पसा आढावा आपल्याला मृत्यूकडे अधिक डोळसपणें पहायला मदत करेल असा अंदाज करायला हरकत नसावी.  खालील कांहीं उदाहरणें स्मरणातून दिलेली आहेत, कांहीं माझ्या संग्रहातील पुस्तकांमधून घेतलेली आहेत, कांहीं विविध ग्रंथालयांमधील पुस्तकांमधून, अन् कांहीं वेबवरून.  मृत्यूवरील काव्यांमध्ये, जीवनाचे, नातेसंबंधांचे, तसेंच सामाजिक, सांस्कृतिक संदर्भही कसे येतात, हेंही आपल्याला दिसेल.

पुढे जाण्यापूर्वीं हें स्पष्ट करायला हवें की, आपण इथें काव्यसमीक्षा करत नसून, केवळ मृत्यूविषयीच्या रचनांची झलक पहाणार आहोत. वर कांहींसा अप्रत्यक्ष उल्लेख केल्याप्रमाणें, आपल्या सर्वांना कुतूहल असतें की वेगवेगळ्या भाषांमधल्या, भिन्नभिन्न काळातल्या, संत-कवि-शायर-साहित्यिकांनी व इतरांनी ‘मृत्यू’ या, अटळ पण औत्सुक्य जागवणार्‍या, विषयाशी संबंधित काय-कशा रचना केलेल्या आहेत.  म्हणून ही कांहीं उदाहरणें.  अर्थात्, हा bird’s eye view असल्यामुळे, अनेकानेक भाषा, व अनेकानेक थोर साहित्यिकांच्या रचना, इथें आपण पाहूं शकत नाहीं आहोत. तें माझें  limitation समजावें. (त्याचप्रमाणें, हेंही स्पष्ट करणें आवश्यक आहे की, एखादा काव्यांश, क्रमांतर्गत आधी  किंवा नंतर दिलेला असणें , याचा कवींच्या seniority-juniority शी संबंध नाहीं. )

*

— सुभाष स. नाईक

Subhash S. Naik

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..