नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – १०/११

सारांश , आणि निष्कर्ष :

आपण शेषराव मोरे यांच्या लेखातील मुद्यांवर, तसेच त्यावरील प्रतिक्रियांबद्दलही चर्चा केली, खंडनमंडन केलें, कांहीं माहिती दिली, कांहीं नवीन मुद्दे मांडले .  त्या सर्वाचा सारांश, आणि कांहीं निष्कर्ष,  आतां थोडक्यात पाहूं या.

  • (पण त्यापूर्वी एक स्पष्टीकरण : माझें स्वत:चें मिडलस्कूलपासूनचें शिक्षण इंग्लिश-मीडियम-पब्लिक-स्कूलमध्ये झालेलें आहे ; व पुढील, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट वगैरे सर्व शिक्षणही अर्थातच इंग्रजीतच. नंतरच्याही काळात, कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यामुळे, कायम इंग्रजीतच व्यवहार. संस्कृत मी फक्त हायर-सेकंडरीपर्यंतच शिकलो. त्यामुळे कोणी असा गैरसमज करून घेऊं नये की, मी संस्कृतच्या क्षेत्रातच काम करतो आहे, व म्हणून मी त्या अनुषंगानें माझी मतें मांडलेली आहेत. वस्तुस्थिती तशी नाहीं).
  • संस्कृत ही ‘देव ’ नांवाच्या टोळीची (क्लॅन) भाषा होती, म्हणून तिला ‘देववाणी’ म्हणत ; याचा देवता (डेइटी) किंवा ईश्वराशी कांहींही संबंध नाहीं. पुरातन काळीं ही भाषा जनसाधारणही बोलत असत.
  • संस्कृत ही प्राकृत भाषांपासून निर्माण झाली ही विचारांची ‘फॅलसी’ आहे. वैदिक भाषा (छांदस किंवा देववाणी), अर्थात जिला हल्ली आर्ष-संस्कृत म्हणतात, ती पाउड (प्राकृत) म्हणजे पाली-अर्धमागधी-शौरसेनी-महाराष्ट्री-पैशाची या भाषांपेक्षा कांहीं शतकें वा कांहीं सहस्त्रकें पुरातन आहे. त्यामुळे या भाषांमधून आर्ष-संस्कृत निर्माण होण्याचा प्रश्नच उठत नाहीं ; उलट त्याच , संस्कृतचें सरलीकरण करून तयार झालेल्या बोली आहेत. ( आणि आपण हें सोदाहरण पाहिलेलें आहे).
  • वैदिककालीन अन्य भाषांकडून आर्ष-संस्कृतनें कांही शब्द वगैरे घेतलेले आहेत, पण अशी प्रक्रिया व देवाणघेवाण सर्वच भाषांच्या बाबतीत चालते ; पण त्यामुळे, संस्कृत ही त्या भाषांपासून निर्माण झालेली आहे, असें अजिबात नाहीं.
  • आज जी संस्कृत (पाणिनीच्या कालानंतरची ) दिसते, ती म्हणजे आर्ष-संस्कृतवर संस्करण झाल्यामुळे निर्माण झालेलें रूपांतर आहे, पाणिनी किंवा कुणी वैयाकरणानें मुद्दाम निर्माण केलेली भाषा नव्हे. कोणीही अशी शून्यातून भाषा निर्माण करूं शकत नाहीं. ( बोलीभाषेतून, घेतले तर शब्द वगैरे घेतले जातात; पूर्ण नवीन भाषा बनवितां येत नाहीं. याची अनेक उदाहरणें आहेत). वैयाकरणी काय करतात, तर, जी भाषा प्रचलित असते , तिचे फक्त नियम ते लिहितात, व सुसूत्रपणा आणतात.
  • नंतरच्या काळात, संस्कृत ही कुणाची मातृभाषा म्हणून उरली नसली तरी ; संपर्क-भाषा, ज्ञानभाषा , संस्कृतीची भाषा, म्हणून अनेक शतकें तिनें योगदान दिलेलें आहे.
  • प्रादेशिक भाषांमध्ये जी ग्रंथनिर्मिती सुरूं झाली, तिचा आधार, संस्कृत ग्रंथच होता. उदा. रामायण, महाभारत, भगवद्गीता, हरिवंश, भागवत, इत्यादी.
  • समाजातल्या घटकानें किंवा घटकांनी , कांहीं अन्य घटकांना या ज्ञानापासून वंचित ठेवलें, ( आणि, तें नुसतें आक्षेपार्हच नाहीं, तर निंदनीयही आहे ) ; पण त्यासाठी समाजाला वा समाज-घटकाला जबाबदार धरायला हवें, कुठल्याही भाषेला नव्हे. (आपण हेंही सोदाहरण पाहिलेलें आहे).
  • संस्कृत भाषेच्या काठिण्याबद्दल आपण अन्य भाषांच्या उदाहरणांवरून पाहिलें की, कितीतरी भारतीय व परदेशीय भाषा , ( अगदी मराठी, तमिळसारख्या भारतीय भाषाही ) पर-भाषियांना ‘कठीण’ वाटतात. पण त्यामुळे, त्या भाषांचे महत्व आणि त्यांचा वापर अजिबात कमी होत नाहीं.
  • ज्यांना त्यांच्या नित्याच्या प्रोफेशनल कामांमुळे संस्कृत शिकाय-समजायला वेळ नाहीं, त्यांना ती शिकण्याचें कुठलेंही कंपल्शन नाहीं, बंधन नाहीं. पण , ज्यांना तिचा वापर करायचा आहे, किंवा ती शिकून पुरातन ज्ञान-कला-साहित्य  इत्यादींची माहिती मिळवायची आहे, त्यांना तसें करायला नक्कीच मुभा आहे.
  • हल्लीच्या काळीं सायन्सचें महत्व आहेच; यात वादच नाहीं. पण, सर्व-समाजच जर नुसतेंच सायन्स शिकून व फक्त त्याच  क्षेत्रात वावरायचें म्हणेल, तर समाज एकसुरी होईल, व या ‘लॉपसाइडेडनेस’चा समाजाच्या उन्नतीवर अनिष्ट परिणाम होईल. समाजाची चतुरस्र प्रगती आवश्यक असते; आणि तसेच होणार, कारण प्रत्येकाची आवडनिवड भिन्न असते. समाज कुणावरही अमुक एका प्रोफेशनची सक्ती करूं शकत नाही.
  • गेली शतकें-सहस्त्रकें, राज्यें बदलली , राज्यकर्ते बदलले, राज्यांच्या सीमा बदलल्या, अन्य अनेक बदल झाले; पण भारतात भावनिक-एकता अखंड राहिली, याचें कारण संस्कृत-संस्कृती आहे.

 

  • आणि अखेरीस :
  • संस्कृत आतां राष्ट्रभाषा बनणें कठीण आहे ; तो चान्स १९४७-१९५० मध्ये हुकला.
  • संस्कृतच्याद्वारें शतकानुशतकें चालत आलेलें ‘रिच् हेरिटेज्’ आपण दुर्लक्षित करतां कामा नये. तें प्रिझर्व व्हावे म्हणून सरकारनें ‘फोकस्ड प्रयत्न’ करायला हवेत.
  • सरकारनें, (अजून तसें केलें नसल्यास) , संस्कृत ही एक ‘मान्यताप्राप्त भाषा’  म्हणून  डिक्लेअर करायला हवी. तेच योग्य होईल.

– – –

(  पुढे चालू ) —   (परिशिष्टें )

— सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..