नवीन लेखन...

पद्य आणि मृत्युविचार : भाग-४/११

जपानी काव्य :

जपानीमध्ये अनेक काव्यप्रकार आहेत, जसें की हायकू, तांका, रेंकु वगैरे. त्यातील हायकू हा प्रकार जगप्रसिद्ध झालेला आहे. हायकूमध्ये सहसा निसर्ग-चित्रण आढळते. पण हल्ली इतर विषयांवरही हायकू लिहिले जातात.

मृत्यूचा उल्लेख असलेली ही कांहीं उदाहरणें  (भाषांतरित)  –

All the time I pray to Buddha

I keep on

killing mosquitoes

– Kaboyashi Issa (मध्ययुगीन कवी)

My life, –

How much more of it remains ?

The night is brief.

–   Masaoka Shiki

I kill an ant.

I realize my three children

are watching.

–  Kato Shusan

…. but only agony, and that has ending

And the worst friend and enemy is Death.

आधुनिक जपानी संस्कृतीवर निश्चितच ‘हिरोशिमा-नागासाकी’चा परिणाम झाला असणारच, आणि तो काव्यात उमटलेला असणारच. त्यामुळे, हल्लीच्या जपानी काव्यात  मृत्यूचा उल्लेख येणें अटळ आहे. जपानीत मृत्यूकाव्याला ‘जिसेई’ ( Jisei ) म्हणतात, व अशा काव्याच्या बर्‍याच anthologies जपानीत आहेत.

‘हिरोशिमाच्या कविता’ या संग्रहातील कांहीं कविता पाहूं या. ( मूळ कवी : लोगे संकिची . भाषांतर : निरंजन उजगरे व हिरेआकी झरीदा ) –

६ ऑगस्ट १९४५ च्या

…. गहिर्‍या दिवसाच्या अंधारात

माणसानं ईश्वराचा

जाळून वध केला.

आजच्या रात्रीं

हिरोशिमाची आग

माणसाच्या बिछान्यावर उतरली.

ज्वाळांचा ऋतू

दगडमातीचा खच आणि पांढर्‍या हाडकांमुळं

हिरोशिमाची उंची तीन फुटांनी वाढलीय् .

 

मृत : दोन लाख सत्तेचाळीस हजार

हरवलेले :  चौदा हजार

घायाळ : अडतीस हजार

अणुस्फोट म्युझियम मध्ये

जळालेले दगड

वितळलेली कौलं

आणि काचेच्या वाकड्यातिकड्या बाहुल्या

प्रदर्शित केल्या जातायत् .

 

हिरोशिमाच्या कविता एवढ्या प्रत्ययकारी आहेत की शब्दाशब्दाला मृत्यू डोळ्यांपुढे थैमान घालतो.

*

फारसी काव्य :

उर्दू काव्य हें मुख्यत्वें फारसी काव्याच्या आधारवर उभें आहे. फारसीतील ( व उर्दूमधील ) प्रेमविचारात ‘इश्क़े हक़ीक़ी’ म्हणजे  ‘ईश्वरप्रेम’ हा भाग येतो ; आणि त्यामुळे फारसी ( व उर्दूत ) मृत्यूचा उल्लेखही असतो.

फारसीतील उमर खय्यामच्या दोन रुबायांचें हें इंग्रजी भाषांतर  पहा –

That even my buried ashes such a snare
Of vintage shall fling up into the air
As not a True-believer passing by
But shall be overtaken unaware.

Ah, make the most of what we yet may spend

Before we too unto the Dust descend

Dust into Dust, and under Dust to lie

Sans Wine, sans Song, sans Singer, and  – sans End !

  • (Translation by E. Fritgerald)

फारसी कवी निझामी याच्या कांहीं पंक्तींचें हें भाषांतर पहा –

Many, like me, are sleeping in the grave

And, no one remembers that all must sleep there too.

तसेंच, फारसीत (व उर्दूतही) काव्यातील प्रतिमेचा (उदा. मद्य ) वरवरचा अर्थ एक असूं शकतो व आंत लपलेला अर्थ भिन्न असूं शकतो. त्यामुळे, अनेकदा अशा काव्यात वापरलेली प्रतिमा, लक्ष्यार्थानें  मृत्यूबद्दलची असूं शकते. सूफी संतांच्या कवितेसुद्धां  हें दिसून येतें.

*

— सुभाष स. नाईक

Subhash S. Naik

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 293 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..