देशातील एका महानगरचे पर्यावरण सुधारण्याचे महत्वपूर्ण कार्य साहेबांच्या खांद्यावर आहे. आज पर्यावरणावर एक राष्ट्रीय संगोष्टी आहे. मुख्य वक्ता म्हणून साहेबांना बोलविले आहे. सकाळी साहेब उठले आणि संडासात गेले. संडासात पश्चिमी पद्धतीचे टायलेट चकाचक चमकत होते. त्यांची कामवाली रोज भरपूर हार्पिक टाकून भरपूर पाण्याने टायलेट स्वच्छ करते. त्याच सोबत पर्यावरण साठी घातक असलेले रसायन युक्त पाणी अंततः नदीत पोहचतेच. नंतर साहेबांनी विदेशी कंपनीच्या केमिकल युक्त टूथपेस्टने दात स्वच्छ केले. नाही नाही म्हणता टूथपेस्टची काही मात्रा साहेबांच्या पोटात हि गेली. विदेशी महागडे केमिकल युक्त शेम्पू व साबण लाऊन साहेबांनी भरपूर पाण्याने (५० ते ६० लिटर) स्नान केले. तरीही साबण आणि शेम्पूतल्या घातक केमिकल्सचे काही अंश त्वचेच्या माध्यमातून साहेबांच्या शरीरात गेलेच. याशिवाय केमिकल्स युक्त प्रदूषित पाणीहि नदीत पोहचलेच. साहेबांनी विदेशी कंपनीचे महागडे तेल हि मैदान सोडणाऱ्या केसांवर लावले. तेलात मिनिरल ओईल व वनस्पती तेल (पामोलीन) हि होते. साहेबांचे केस काही वर्षांत गळणार हे निश्चित. साहेब हेल्थ कांशस, आज त्यांनी रिफाइंड तेलात बनलेले पोहे नाश्त्यात खाल्ले. रिफाइंड तेल आज होणार्या ५० टक्के हृद्याघातासाठी जवाबदार आहे. पुढे मागे साहेबांना, त्वचेचे व पोटाचे रोग किंवा केंसर आणि हृदयरोग झाले तर त्यात आश्चर्य नाही.
पूर्वी केंद्र सरकारच्या कार्यालयांत फक्त सचिवाला गाडीची सुविधा होती. बाकी वरिष्ठ अधिकार्यांना फक्त जाण्या-येण्यासाठी गाडी. तेही किमान २ अधिकार्यांना एकाच गाडीत आणले जायचे. पण आजकाल सर्वच प्रशासनिक सेवेच्या अधिकार्यांना स्वतंत्र गाडी दिली जाते. महानगरचे प्रदूषण वाढविण्यात साहेबांच्या गाडीचा हि योगदान आहेच. असो. साहेब एकदाचे कार्यालयात पोहचले. साहेबांच्या चेंबरच्या बाहेर तीन-चार हिरवेगार गमले ठेवले होते. गमल्यात प्लास्टिकचे पौधे होते. साहेबांना हिरवळ आवडते, पण खर्या पौध्यांना पाणी द्यावे लागते. डास होण्याची भीती. साहेबांना हिरवळ पाहिजे होती, म्हणून प्लास्टिकची हिरवळ. साहेबांच्या चेंबरमध्ये व खिडकीच्या बाहेर हि काही प्लास्टिकचे पौधे असलेले गमले ठेवलेले होते. भिंतीवर हि हिरव्यागार जंगलाची रासायनिक रंगांनि सजलेली भली मोठी पेंटिंग हि लावलेली होती.हे सर्व पाहून, साहेब किती पर्यावरण प्रेमी आहे, साहेबांना भेटायला येणार्या पाहुण्यांना वाटणे साहजिकच आहे.