नमस्कार
आज मी पशुपती व्रत बदल थोडीशी माहिती सांगणार आहे हे व्रत विधी पूर्वक केल्यास नकीच लाभ मिळतो म्हनुनच इच्यापुर्ती साठी हे व्रत करावे
पशुपतिनाथ व्रताचा महिमा?
पशुपतिनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत जेव्हा तुम्ही हा व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याची महिमा कळेल या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने तुमचे रखडलेली कामे सहज पूर्ण होतील एकदा तुम्ही महादेव पशुपतिनाथ च्या चरणी जाताल तेव्हा देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात असे शिव महापुराना मध्ये सांगितले आहे.पशुपतिनाथ व्रत कधीपासून सुरू करावा?
पशुपतिनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही तुम्ही हा व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा व्रत करू शकता कृष्ण पक्ष असो वा शुक्ल पक्ष दिवस फक्त सोमवारचा असावा हे लक्षात ठेवा.
पशुपतिनाथ व्रत कोणी करू नये?
देवाचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालन हारआहेत या जगातील सर्व प्राण्यांचे देव देवतांचे नाथ आहेत म्हणून त्यांना हे कधीच वाटणार नाही माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे म्हणून जे लोक वयस्कर आहेत, आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहेत अशा लोकांनी हा व्रत करू नये.
पशुपतिनाथ व्रत कोण कोण करू शकते?
पशुपतिनाथ व्रत हा कोणीही केला तरी चालतो म्हणजे पुरुष किंवा महिला हे दोघेही व्रत करू शकतात पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते पण हे ही शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी चालत.
पशुपतिनाथ व्रतासाठी लागणारी साहित्य
- पूजेचे ताट
- कुंकू
- अभिर
- गुलाल
- अष्टगंध
- लाल चंदन
- पिवळ चंदन
- अक्षदा (विना तुकडे पडलेले तांदूळ)
- बेल पाने
- धोत्र्याचे फुल
- तांब्याच्या तांब्या
पशुपतिनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी? विधि
सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्ता मध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे मित्रांनो लक्षात ठेवा बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फुल ठेवतात असा कोणताही नियम नाही जर तुमच्याकडे धोत्र्याचे फुल नसेल तर काही हरकत नाही कारण देवाचे देव महादेव भोळे आहेत भोलेनाथ आहेत त्यांना या गोष्टींची गरज नाही फक्त ते भक्ताचं प्रेम बघतात पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा दोनदा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा म्हणजे सकाळची आणि सायंकाळची पूजा होईल
मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या चारीही पूजा कराव्या लागतील म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपतिनाथ व्रताची पूजा करता येईल येईल
मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात त्यामुळे त्यांनी वाहिलेली फुले बेल पाने शिवलिंगावर असतात त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थीत साफ करून घ्या त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा अभिषेक केलेले पाणी थोडसं वाटीमध्ये धरा पूजा करताना कोणतीही घाई करू नका शांततेत पूजा करून घ्या पूजा करते वेळी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप करावा
व त्यानंतर शिवलिंगाला अभिर गुलाल कुंकू अष्टगंध लाल चंदन पिवळा चंदन व्यवस्थित लावून घ्यावा त्यानंतर बेलाची पाने धोत्र्याचे फुल किंवा आणलेली सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकावा आणि देवाच्या पाया पडावे त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे.
पशुपतिनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी
सायंकाळी पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कनकीचे सहा दिवे बनवून घ्यावे लागतील त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावा लागेल लक्षात असू द्या सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळची पूजा करावी लागेल शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले पाच कणकेचे दिवे शिवलिंगा समोर लावावे व उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्या सोबत ठेवावा लागेल त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य किंवा प्रसादाचे तीन हिस्से करून देवा समोर ठेवावे आणि देवाला नमस्कार करावा मनातील इच्छा देवाला सांगावी.
व नंतर प्रसादाचे दोन हिस्से देवा समोरच राहू द्यावे आणि एक हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन जावा लागेल घरा जवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला दिवा लावावा आणि तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करावा उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा हा प्रसाद इतर कोणालाही देता येणार नाही तो स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल अशाच पद्धतीने बाकीच्या चारही सोमवारी पूजा करून घ्यावी तर तुमचा पशुपती वृत्त संपन्न होईल
पशुपतिनाथ व्रताची आरती
जय गंगाधर जय हर जय गिरिजाधीशा ।
त्वं मां पालय नित्यं कृपया जगदीशा ॥ ॐ जय गंगाधर …
कैलासे गिरिशिखरे कल्पद्रमविपिने ।
गुंजति मधुकरपुंजे कुंजवने गहने ॥ ॐ जय गंगाधर …
कोकिलकूजित खेलत हंसावन ललिता ।
रचयति कलाकलापं नृत्यति मुदसहिता ॥ ॐ जय गंगाधर …
तस्मिंल्ललितसुदेशे शाला मणिरचिता ।
तन्मध्ये हरनिकटे गौरी मुदसहिता ॥ ॐ जय गंगाधर …
क्रीडा रचयति भूषारंचित निजमीशम् ।
इंद्रादिक सुर सेवत नामयते शीशम् ॥ ॐ जय गंगाधर
बिबुधबधू बहु नृत्यत नामयते मुदसहिता ।
किन्नर गायन कुरुते सप्त स्वर सहिता ॥ ॐ जय गंगाधर …
धिनकत थै थै धिनकत मृदंग वादयते ।
क्वण क्वण ललिता वेणुं मधुरं नाटयते॥ ॐ जय गंगाधर …
रुण रुण चरणे रचयति नूपुरमुज्ज्वलिता ।
चक्रावर्ते भ्रमयति कुरुते तां धिक तां ॥ ॐ जय गंगाधर …
तां तां लुप चुप तां तां डमरू वादयते ।
अंगुष्ठांगुलिनादं लासकतां कुरुते ॥ ॐ जय गंगाधर …
कपूर्रद्युतिगौरं पंचाननसहितम् ।
त्रिनयनशशिधरमौलिं विषधरकण्ठयुतम् ॥ ॐ जय गंगाधर …
सुन्दरजटायकलापं पावकयुतभालम् ।
डमरुत्रिशूलपिनाकं करधृतनृकपालम् ॥ ॐ जय गंगाधर …
मुण्डै रचयति माला पन्नगमुपवीतम् ।
वामविभागे गिरिजारूपं अतिललितम् ॥ ॐ जय गंगाधर …
सुन्दरसकलशरीरे कृतभस्माभरणम् ।
इति वृषभध्वजरूपं तापत्रयहरणं ॥ ॐ जय गंगाधर …
शंखनिनादं कृत्वा झल्लरि नादयते ।
नीराजयते ब्रह्मा वेदऋचां पठते ॥ ॐ जय गंगाधर …
अतिमृदुचरणसरोजं हृत्कमले धृत्वा ।
अवलोकयति महेशं ईशं अभिनत्वा ॥ ॐ जय गंगाधर …
ध्यानं आरति समये हृदये अति कृत्वा ।
रामस्त्रिजटानाथं ईशं अभिनत्वा ॥ ॐ जय गंगाधर …
संगतिमेवं प्रतिदिन पठनं यः कुरुते ।
शिवसायुज्यं गच्छति भक्त्या यः श्रृणुते ॥ ॐ जय गंगाधर
पशुपतिनाथ व्रताचे उद्यापन कसे करावे?
पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन हे पाचव्या सोमवारी करता येते उद्यापन करते वेळी लक्षात असू द्या उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर चाळीस मिनिटांनी करू शकता
उद्यापण करते वेळेस आपल्याला एक नारळ व ११ रुपये 21 रुपये किंवा 51 रुपये आपल्याला अर्पण करावे लागतात व उद्यापण करते वेळेस 108 तांदूळ किंवा गहू किंवा बेल पान देवाला अर्पण करावे लागतात पण अर्पण करतेवेळी सगळे एकदाच अर्पण करायचे नाहीत एकेक करून तुम्ही ते अर्पण करावेत व आपली मनोकामना देवाला सांगावी
- पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये
- पशुपती व्रत नवरा-बायको जोडीने करत असतील तर मंदिरात जाते वेळेस पूजेचे ताट दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे
- पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असते त्यामुळे पूजेच्या ताटात दोन वेळा पूजा करता येईल एवढीच सामग्री सोबत घ्यावी
- लक्षात असू द्या पूजेचे ताट दोन टाईम तेच वापरावे सकाळी आणि संध्याकाळी
- पाच सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही
- जर तुम्ही किरायाने राहत असाल तर पशुपती व्रत सुरू असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाही
- पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये फक्त एकादशी करावी आणि एक सोमवार जास्त करावा
- पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा मंदिरात जाऊन पूजा करू नये व एक सोमवार जास्त करावा
- पूजा करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम् या मंत्राचा जप करावा
- संध्याकाळच्या पूजेला जे 5 कनकीचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचे असावेत
पूनम भवर
poonambhavar1@gmail.com
Leave a Reply