कॉफी पिता पिता ती म्हणाली,
अरे बाबा एक गुड आणि बॅड न्युज आहे,
माझे लग्न ठरत आहे…..
हे कधीतरी होणारच होते…मी म्हणालो
नाहीं ठरले नाही…
पण ठरेल…
माझ्यावर डिपेंड आहे….
बोल काय करतोस….
आयला एकदम फायनल कडे आलीस…
काय करणार घरात एकाच सांगितले ..
एक तर तू बघ नाही तर हे स्थळ ..
मुलगा काय करतो..
मालदार आहे…
कंपन्या आहेत त्याच्या वडिलांच्या …
एकटाच आहे…
कसा आहे..म्हणजे दिसायला…
अरे मालदार आहे ..हे काय कमी आहे…
बाकी सगळे ऍडजेस्ट होतेच ना…
मग तू कशाला आहेस…
माझा जवळचा मित्र…
तिची ही फिलासॉफी मला पाठ होती ..
तू काय ठरवलेस….
अजून नाही ..
पण ठरेल ..
तुझे काय ….ती म्हणाली..
मी आणि लग्न …
तुला माहित आहे…
माझे ध्येयं….
मी जे अचिव्ह करतो ते मिळाले की लग्न..
तो पर्यंत नो…आणि असे काही अडत नाही…
तू आहेस ना…..आता तिची टर्न होती…
कधीकधी आपण
जस्ट वीक एन्ड …सेलिब्रेट करतोच आहोत ना…
मला नाही वाटत ते रेग्युलर असेल पुढे…
ठीक आहे…तुझे लाईफ सेटल होत आहे ना…
कर ना तू…
माझे झाले की मी करेन…
खरे तर आपल्याला, लग्नाची गरज आहे का ?
पॉईंट आहे तुझ्या प्रश्नात…ती म्हणाली..
मग काय …
मी सागतो तू करच लग्न…
मी काय मजनू वगैरे बनणार आंही….
ती हसली…
कोफी ची दुसरी राउंड सांगितली सोबत…
ब्रेड बटर….म्हटले
तितकाच वेळ बोलता येईल…
तू करच…मी सागतो म्हणून…
ती अटॅचमेन्ट वगैरे माझ्या दृष्टीने भंकस आहे..
साला मेंदूचा मोनोपॉझ सुरु होतो यामध्ये..
माझे पिक्चर क्लिअर आहे..
तुझे …येस माझे पण …..ती म्हणाली…
मी त्या मुलाला भेटली आहे…थोडे टक्कल आहे…
जरा थोराड आहे….ठीक आहे…
काही हवे तर किंमत मोजावीच लागेलच ना …
लाईफ इज ऍडजेस्टमेंट यार..तो म्हणाला.
ती तेच म्हणाली ..
दोघेही प्रॅक्टिकल आहोत आपण.
खूप गप्पा होत होत्या….
जाताना ,हणाली…
अजून लग्न ठरले नाही…
मी होकारही दिलेला नाही….
खरेच आई – वडलांना साग.
आम्ही निघालो…
भेटू वीक एंडला…
आम्ही निघलो…
तिला घरी सोडली…
घरी असाच बसलो असताना
रात्री ११ वाजता फोन वाजला…
तिचाच फोन होता…
आता काय म्हणते ती…
असे म्हणून फोन घेतला…
काय ग काय झाले…
ती म्हणाली…
जाऊदे यार …
ते लग्न बिग्न…
आपण असेच राहू…..
मी मनापासून हसलो…
मला एक माहित होते…
आपल्या पतंगाला ढील दिला
की दुसऱ्याचा पतंग
आपोपाप कटतो……
— सतीश चाफेकर.
Leave a Reply