तिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी .
तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते ,
मुलगा चांगला होता . पण एक दिवशी स्कुटरचा अपघात झाला आणि तो गेला.
फक्त लग्नाची तारीख ठरायची राहिली होती.
खरे तर ती मला पण आवडली होती , पण तिची ही अवस्था.
मी तिच्या वडिलांना म्हणालो , मित्र म्हणून करेन.
पण काही बुमरँग झाले तर मलाच झेलावे लागणार.
तिच्या वडिलांना माझ्या बोलण्याचा अर्थ समजला.
हळू हळू त्यांच्या घरी जाणे वाढवले.
कधी ती गप्पा मरण्यासतघी येत असे तर कधी आतल्या खोलीतच असे.
तिचे वडील नामाकिंत इस्टेट एजन्ट होते. स्वतःची फर्म होती.
वडील आणि भाऊ दोघे व्यवसाय बघत , आई हाऊसवाईफ .
एक दिवशी तिला बाहेर जायचे होते , पण घरात गाडी नव्हती .
तिने तिचा जॉब तो मुलगा गेल्यावर सोडलाच होता. चंगली एम बी ए झालेली होती. तिला गाडी चालवता येत होती.
तिचे वडील म्हणाले तू ह्यांच्याबरोबर जा अरे घरातलाच आहे.
खरे तर ड्राईव्ह करू शकत होती, परंतु तिचा कॉन्फिडन्स पार गेलेला होता.
ती तयार झाली.
तिचे काम झाले परंतु अर्धवट.
मी म्हणालो तुला घरी सोडतो. दोनतीन दिवसात काम होईल.
पेपर्स मी आणतो डोन्ट वरी.
त्यासाठी तिची माझी फोनाफोनी झाली.
काम झाले.पण ती आता बोलू लागली.
कधी ती फोन करत असे , तर कधी मी.
फोन नाही केला तर विचारत असे . कुठे आहे वगैरे.
इकडल्या तिकडल्या गप्पा होत. फोन मात्र चालू होते.
तिच्या वडिलांना हे सर्व समजत होते
त्यांनी ‘ कॅरी ऑन ‘ चा सिग्नल आधीच दिला होता.
जवळजवळ वर्ष लागले मला तिला त्या वलयातून बाहेर काढायला.
हळू हळू भेटू लागलो.
सहाजिकच तिला घरातून विचारले गेले.
तिची सम्मती मिळाली पण मूक.
ठीक आहे आणखी तीन महिने वाट पाहू.
एके दिवशी गाजावाजा न करता आम्ही रजिस्टर लग्न केले.
ती माझ्या घरी आली. तिचे सर्व सामान होते..
त्यात एक फोटोफ्रेम होती. त्या मुलाची जो स्कुटर अपघातात मरण पावला त्याची ..
तिला माझी भूमिका माहित होती.
मी सांगितले त्याचा फोटो आपल्या बडरूममध्ये ठेव.
तिने तो ठेवला. आमचा संसार सुरु झाला. तो फोटो तसाच तेथे असे.
सुमारे सहा महिन्यातंर तीच म्हणाली ,
आपण तो फोटो बाहेर ठेवला तर चालेल का ? माझ्या लक्षात तिची मानसिक अवस्था लक्षात आधीच आली होती.
मी म्हणालो तुझी इच्छा , मला अडचण नाही.
पण मला ………?..
..ती काहीच बोलली नाही.
आजही तो फोटो बाहेरच्या खोलीत आहे.
मला माहीत आहे काही काळाने तो फोटो कुठेतरी वरच्या कपाटात जाईल.
माझा गेम प्लॅन यशस्वी झाला होता…
5 वर्धे झाली या घटनेला.
तिच्या वडलांची साथ होती म्हणूनच …अर्थात ते काही बाबतीत काहीसे अनभिज्ञ होते.
पण माझा खरा प्लॅन त्याच्या कधीच लक्षात येणार नव्हता, एव्हाना ती स्कुटर भंगारात विकली गेलीही असेल ?
मनात विचार आला ..
‘ पेशन्स इज द की… ‘
— सतीश चाफेकर.
Leave a Reply