वाट चढणीची ही गडकोटी
सदैव मी चालतची राहिलो
उरली आता, चारच पाऊले
आत्ता माथ्यावरती पोहचलो
आव्हानी पथ्थर पाऊलवाट
दुर्दम्य! विश्वासाने चाललो
सभोवार सुखदा हिरवीगार
गतस्मृतीं! आठवीत राहिलो
वाहतो,शीतल पवन गंधला
झुळझुळ ती झेलीत राहिलो
लोचनी, माझे गावकुंस सुंदर
जिथे पडलो, झडलो, घडलो
सारीपाट, साऱ्याच जीवनाचा
मीच, आज उलगडित राहिलो
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ५९
२६ – २ -२०२२
Leave a Reply