मंडळी , पहाटेचे ४.३० वाजलेले, सिंहगडाच्या पायथ्याशी कोंढणपूर नामक एका गावात निर्मिती फार्म्च्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर अविरत बरसणारा पाऊस अाणि रातकिड्यांची किरकिर….. कधी कधी असा एकांत अापल्याला अंतर्मुख करून जातो……अख्खा जन्म पुरणार नाहि इतकं निसर्ग सौंदर्य अापल्या अाजूबाजूला असतं , पण निव्वळ ऐहिक सुखाच्या मागे लागून अापण असे क्षण जगायचंच विसरून जातो…..बघा कधीतरी असं पहाटेचं शांत बसून…..निसर्ग खूप काहि शिकवून जातो अाणि निसर्गापुढे अापण किती खुजे अाहोत याची जाणीव करून देणार्या विधात्यासमोर अापण अापोअाप नतमस्तक होतो !
इथे माझी कल्पनाशक्ति संपली मित्र—मैत्रिणिंनो…..जे अाणि जसं सुचलं तसं पाठवतोय…..बघा अावडतंय का…..
कधी बरसतो धो धो पाऊस
मरगळ जाते दूर निघून
कधी परंतू अखंड रिपरिप
दूरदेशीची ती येई समीप
कधी अचानक झोडपतो मग
जशी अाठवण तुझी नी…तगमग
निरभ्र सारे अासमंत मग
अवतरते बघ थंडी होऊन
कळकटलेल्या किटलीमधला
घोट चहाचा अमृत होतो
शब्दहि येती अवचित ओठी
कॅनव्हास मग…..जिवंत होतो!
श्रेय कुणाचे , मिळते कोणा ?
निसर्ग असतो थोर गुरु
बांधून इमले शब्दांचे मग
कुणीही लागतो कविता करू
जलबिंदूंचा खारट साठा…
डोळ्यांमधूनी अवतरतो
अखंड उरतो तुझाच अाठव
तूमय तन्मय ….. उदय उरतो……
उदय गंगाधर सप्रेम—ठाणे
२ जुलै २०१७..०५.२०वा.
Leave a Reply