पाऊस असा हा पडताना
वर्षाव, आठवांचा होतो
बरसणाऱ्या सरिसरितूनी
तू बिलगल्याचा भास होतो
स्मरते, अजुनही ती पिंपर्णी
अंतरी मी चिंब भिजुनी जातो
पाऊस असा हा पडताना
तुझा, गंध बकुळी दरवळतो
रिमझिमता भावनांच्या स्मृती
अंतरास, आजही मोहर येतो
पाऊस असा हा पडताना
तुझ्याच, आठवात मी दंगतो
पाऊस,असा हा पडताना
गड़गडाट, गतस्मृतींचा होतो
मनभावनांची, ओढ़ अनावर
जीव, व्याकुळ होवूनी जातो
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१२६.
२९ – ४ – २०२२.
Leave a Reply