क्षणक्षण सारे होता धुसर
पापण्यातूनी दाटती पाझर
व्याकुळ,कृष्णमेघ सावळे
त्या ओढ़ वसुंधरेची निरंतर
सृष्टिचे रूप अवीट मनोहर
तोषवीणारा मृदगंध अनावर
लपंडाव तो उन सावल्यांचा
मोहवितो मनामनास निरंतर
चिंबचिंब ओल्या पाऊसधारा
सुखद सरिंची रिमझिम सुंदर
आसक्त, ओढ़ प्रीतसखीची
तनमन हृदया लागे चिरंतर
जरी सुखदु:ख्खदी मेघडंबरी
प्रीतभावनांचे अंतरी गहिवर
ऋतुऋतुंचे सोहळेच लाघवी
कृपाळू, कृपावंत तो दिगंबर
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १५१.
१२ – ६ – २०२२
Leave a Reply