काल ‘राऊळ’ लेख लिहिला आणि आमच्या सिंधुदुर्गातल्या श्रीमती मृणालीणी डुबले यांनी, आमच्या कोकणात पाहुण्यांसाठी ‘पावने-रावळे’ असा शब्द वापरतात हे माझ्या निदर्शनास आणून दिलं. ‘पावने-रावळे’ शब्दात, पावन्यासोबत जो ‘रावळे’ शब्द वापरला गेलाय, तो ‘राऊळ’ शब्दाचा अपभ्रंश असावा. ‘राऊळ’ शब्द देवळासाठी आणि त्या अर्थाने देवासाठीही वापरला जातो.
शहरात व इतरत्रही आपण पाहुण्यांसाठी ‘अतिथि देवो भव’ हे संस्कृत वचन मुक्त मुखाने वापरतो. कोकणातल्या बोलीतलं ‘पावने-रावळे’ हे ग्राम्य वचनही, अगदी त्याच्या अर्थानेही, ‘अतिथि देवो भव’ बरोबर साम्य दाखवणारं आहे असं मला वाटतं. ‘अतिथी’ म्हणजे ‘पावने’ आणि ‘देव’ म्हणजे ‘रावळे’ हे खुप जवळचं नातं आहे की नाही?
आपल्याकडे अतिथीला देव माणून पुजण्याची पद्धत होतीच, ग्रामिण भागात अजुनही शिल्लक असेल. पावने म्हणजे रावळे, हेच ‘अतिथि देवो भव’
— नितीन साळुंखे
9321811091
माझ आडणाव रावळे पण आम्ही बुद्धीष्ट आहोत. मग काय आमच्या पुर्वजांनी हा स्विकारला असेल की काय???