मनातल्या कोलाहलाला मार्गस्थ करतोय मी,
नेणीवेच्या जाणिवांना ही …
प्रकांड तांडवाचा अभिशाप भोगतोय..
उसळणाऱ्या माझ्यातल्या उर्मींना शमवतोय ही मीच…
सोनेरी वर्खाचा देखणा गालीचा,
अवकाशाचे मखमली पांघरुण आच्छादून, निद्रीस्त होणारा,
सृष्टीच्यावरच्या प्रत्येक घटनांचा साक्षीदार ही मीच…
क्षितिजाचा अनादी अनंत रक्षक मी …
निर्झरणि , तरंगिणी चे समर्पण स्विकारणारा ,
व्योमात व्यापून राहीलेल्या शशांक,भास्कराची धूनी शांत करणारा ही मीच ..
रक्षक ही मीच, भक्षक ही मीच …
आश्वस्त ,निरागस तरीही अनासक्त
भीष्मा सारखा योगी, पयोधि मी व्रतस्थ…
© लीना राजीव.
— सौ. लीना राजीव देशपांडे
Leave a Reply