पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी जन्म २८ ऑक्टोबर १९५५ रोजी मद्रास येथे झाला.
इंद्रा नूयी हे पेप्सिको या कंपनीच्या मे २००६ पासून चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. त्यांचे नागरिकत्व अमेरिकन आहे. पेप्सिको ही जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे जी अन्न आणि पेय व्यवसाय करते.
इंद्रा कृष्णमूर्ती नूयी यांचे वडील ‘स्टेट बँक ऑफ हैदराबाद’ मध्ये काम करत असत आणि त्याचे आजोबा एक जिल्हा न्यायाधीश होते. नूयी यांचे शिक्षण अँग्लो इंडियन उच्च माध्यमिक मद्रास स्कूलमध्ये झाले, व १९७४ साली मद्रास ख्रिश्चन कॉलेज मध्ये पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर जॉन्सन आणि जॉन्सन या कंपनी उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यांनी टेक्सटाइल फर्म ‘मेत्टर बर्डसेल बरोबरही काम केले. यानंतर इंद्रा यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठात १९७८ मध्ये प्रवेश घेतला आणि तेथे त्यांनी ‘पब्लिक ऍण्ड प्रायव्हेट मॅनेजमेंट’ चा अभ्यास केला. १९८० मध्ये, शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमेरिकेत नोकरी करण्याचा निर्णय केला व बोस्टन कंसल्टेशन ग्रुप मध्ये व ‘मोटोरोला’, ‘एसिया ब्राउन बोवेरी या कंपन्यांच्यात काम केले इंद्रा यांनी मोटोरोला कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून १९८६ ते १९९० दरम्यान म्हणून काम केले.
१९९४ मध्ये इंद्रा नूई पेप्सिकोमध्ये सामील झाल्या त्यांना पेप्सिकोच्या दीर्घकालीन विकास धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. इंद्रा नूई यांनी पेप्सीकोचे पुनर्रचनाही केले. २००६ मध्ये, इंद्रा नूयी पेप्सिकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनल्या. फॉर्च्युन मासिकाने २०१४ मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली व्यवसाय महिलांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. जवळजवळ सर्व इंदिरा नुयीची धोरणे पेप्सिकोला पुढे नेण्यासाठी यशस्वी झाली आहेत, आणि त्यांच्या या सर्व योजनांमध्ये गुंतवणूकदार आहेत.
इंद्रा नूई यांचा वार्षिक पगार आहे १७५ करोड रुपया पेक्षा जास्त. म्हणजे दिवसाचा पगार ५० लाख रुपयाच्या जवळपास.
इंद्रा नूयी यांचे राज किशन नूयी यांच्याशी विवाह झाला आहे. नूयींच्या दोन मुली आहेत, ते ग्रीनविच कनेक्टिकटमध्ये राहतात. सध्या त्यांची एक मुलगी सध्या येल विद्यापीठातील व्यवस्थापनाचा अभ्यास करीत आहे. त्यांची मोठी बहीण चंद्रिका कृष्णमूर्ती टंडन प्रसिद्ध गायिका व संगीतकार आहेत.
२००७ मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply