नवीन लेखन...

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 18

दिवस हा देवांचा आणि रात्र ही राक्षसांची, जंतुंची… सर्व शुभकार्ये दिवसा आणि सर्व निषिध्द कामे रात्रीची. कारण ?
….. त्यांचा रात्रीस खेळ चाले…

काही भारतीय धारणा अश्या आहेत, ज्याचा पुरावा दाखवता येत नाही. पण त्यांचे अस्तित्त्व भारतीय संस्कृतीला मान्य आहे. आता “अणु” कुठे दाखवता येतो ? ती धारणा आहे. दाखवता येणार नाही. गृहीत धरून विज्ञानातला अख्खा परमाणुवाद त्यावर सिद्ध झालाय. केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा यावर संशोधन सुरू आहे. गाॅडस पार्टीकल ही त्यातूनच जन्माला आलेली संकल्पना होती. विज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी सिद्ध करायच्या आहेत, त्यातीलच एक म्हणजे रात्रीस खेळ चाले.

अदृश्य शक्तींचे प्राबल्य सूर्यास्तानंतर वाढते. सूर्यास्त झाल्यावरच वनस्पती आपले श्वसन बदलवतात.
सूर्यास्तानंतरच पक्षी आपले खानपान थांबवतात.
सर्व प्रकारची शुभकार्ये सूर्यास्तानंतर वर्ज्य सांगितलेली आहेत. ही अंधश्रद्धा नाही. ही धारणा आहे. म्हणून लग्न, मुंज, बारसे, वास्तुशांत, होम, या सारख्या कर्मकांडापासून अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या अग्नियानाच्या प्रक्षेपणाची वेळ देखील सूर्यावर अवलंबून आहे. याला मुहुर्त असा शब्द आहे. पण या शब्दाची सुद्धा काहीजणांना अॅलर्जी आहे. भारतीय परंपरांना छेद देणारी विधान करणं म्हणजे बुद्धीवाद असे काहीजणांना वाटते, म्हणून फक्त सांगितले. असो.

तर रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यावर, तापमानात घट झाल्यावर, दमट वातावरणात, जंतुंचे प्राबल्य जास्ती असते. जे आपल्या स्थूल डोळ्यांना दिसू शकत नाहीत, असे अतिसूक्ष्म जंतु सूर्यास्तानंतर वाढतात. आपण प्रत्येक वेळी सूक्ष्मदर्शी यंत्र घेऊन जंतुंना शोधू शकत तर नाही ना. पण त्यांच्या उत्पत्तीच्या विशिष्ट जागा असतात. जंतुंची वाढ होण्यासाठी विशिष्ट तापमान लागते, विशिष्ट जंतुंना विशिष्ट जागा आणि विशिष्ट हवामानच लागते. हे सर्व वैज्ञानिक सिद्धांत भारतीय संस्कृतीला मान्यच आहेत, किंबहुना भारत हीच या विचारांची जन्मभूमी आहे. म्हणून तर आपल्याकडे शौच अशौच सिद्धांत सांगितला गेलाय.

घरामधल्या कोणत्याही खोलीपेक्षा संडासमधे अनेक प्रकारचे जंतु असतात, वाढतात, हे ओळखूनच मलविसर्जन घरापासून लांब, बाहेर करावे. मल विसर्जन करताना उकीडवे बसावे म्हणजे जंतुसंसर्ग कमी होतो. मलविसर्जन झाल्यानंतर केवळ मलद्वार आणि डावा हातच नाहीत तर दोन्ही पाय, चेहेरा, डोळे सुद्धा पाण्याने धुवावेत, त्यासाठीचे पाणी अगोदरच काढून तयार ठेवावे, ही शुद्धीकरणाची, अंगावरील जंतुसंसर्ग घालवण्याची शास्त्रीय पद्धत नव्हती काय ? पण आज छोट्या मोठ्या शहरात अॅडजेस्ट म्हणून संडास घरातच बांधले जातात, ( पूर्वी घरात खायचे आणि मागे परसाकडे जायचे, आता बाहेर खायचे आणि घरामध्ये येऊन मलविसर्जन करायचे. सुधारणा आणि विकास.)
मलविसर्जन करायला पुनः त्या भांड्यावरच फतकल मारून बसतात, कमोडवर सर्वात जास्त जंतु असतात, हे विज्ञानाने वारंवार सांगून देखील काटकोनात बसून मलविसर्जन. नंतर पाणी सुद्धा वापरत नाहीत. (काही ठिकाणी तर हात धुवायला सुद्धा !!) काहीजणांनी त्यातूनही पळवाट शोधत, आम्ही स्वच्छता करायला डावा हात सुद्धा घाण करत नाही, म्हणून भांड्यालाच जेट स्प्रे बसवलेले असतात.
संडासमधेच ब्रश देखील करतात, तिथेच वर्तमानपत्र, पुस्तक देखील वाचतात…. तिथला सगळा जंतुसंसर्ग परत सर्व घरात आणतोय ? याकडे या बुद्धीवादी वैज्ञानिक लोकांचे लक्ष जात नाही काय ?

पण कसं आहे, ते जे जे करतात, त्यावर काहीही विचार न करता, अनुकरण केले तरी चालते. असं लिहिलं तरी आम्ही (संस्कृतीरक्षक) पुराणमतवादी ठरतो. आहोतच. त्याचा राग न येता, उलट ते भूषणच वाटते.

या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
असो.

कोणतीही शुभकार्ये करताना पंचांगानुसार अग्निचे स्थान बघून केली जातात. तिथी, नक्षत्र, दिन, रास हे सर्व सूर्याच्या उदयानुसार बदलते. एवढे अनन्य साधारण महत्त्व सूर्याला असताना, केवळ वेळ होत नाही, सवडच नाही असल्या फुसक्या कारणांसाठी…..
………..जाणिजे यज्ञकर्म……. एवढे महत्त्वाचे कर्मकांड सूर्यास्त झाल्यावर करायचे ?
आता याला काय म्हणावे ?

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..