नवीन लेखन...

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 19

गणपती बाप्पाचा सकाळच्या महापूजेचा नैवेद्य पंचपक्वान्नाचे भरलेले ताट असते. पण सायंपूजेचा नैवेद्य काय असतो ? तर वाटीभर पंचखाद्य किंवा एखादा लाडू.
कशासाठी ?
जे जे देवासाठी, ते ते देहासाठी. या न्यायाने देवाच्या भोजनाचा नियम आपल्यालादेखील तसाच लागू होतो. सकाळचे भोजन आणि सायंकाळचे भोजन याच प्रमाणात घ्यावे, असे आपली संस्कृती पण सुचवते.

कमळ कधी उमलते ?
कमळ कधी मावळते ?
सूर्योदय झाला की उमलते, आणि सूर्यास्त झाला की मावळते. सूर्यफुलाचे नावच मुळी सूर्यावरून ठेवले आहे. त्यांच्याकडे कोणतेही घड्याळ नाही, तरीदेखील त्याला बरोबर कळते, दिवस आणि रात्र. कधी कसे वागायचे, कधी कसे फुलायचे, कधी कसे वळायचे ते !

सूर्योदयाला सुरू झालेला आपला दिवस सूर्यास्ताला संपतो. (निशाचर प्राणी अपवाद आहेत.)

मनुस्मृतिमधील निद्रा प्रकरणामधे देखील “सूर्यामुळे दिवस होतो आणि सूर्यामुळे रात्रही होते, असे सांगितलेले आहे. रात्र ही झोपण्यासाठी, विश्रांतिसाठी. तर दिवस हा दैनंदिन कामे करण्यासाठी आहे.
केवळ आपली पृथ्वीच नव्हे तर सर्व ग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सूर्यापासूनच शक्ती, उर्जा मिळवित असतात. सूर्याच्या अस्तित्वामुळेच आपले अस्तित्व आहे, याचे ज्ञान आमच्या ऋषीमुनीना होते. आणि ते त्यांनी लिहूनदेखील ठेवले आहे.

सगुणरूपातील एकमेव देवता म्हणजे सूर्य. रामदास स्वामीनी सर्व तरूणांना सूर्यनमस्काराचे, व्यायामाचे महत्व पटवून दिलेलेच होते.ते स्वतः दररोज शेकडो समंत्र सूर्यनमस्कार घालीत असत.

भोजनाच्या संदर्भात आणखी एक श्लोकात सांगितले आहे,
सायंकृते प्रभाते जीर्यती,
प्रभातकृते सायं जीर्यती.
सकाळी जेवलेले अन्न सायंकाळी पचते, तर सायंकाळी घेतलेले अन्न सकाळी पचते.
सायंकाळी आणि सकाळी असेच शब्द या श्लोकामधे आहेत. दुपार आणि माध्यान्ह असे शब्द नाहीत. याचा अर्थ जेवायचे कधी तर सकाळी आणि सायंकाळी.

काही जण म्हणतील, या जेवायच्या वेळा त्याकाळात ठीक होत्या. आजच्या काळात त्या सुसंगत नाहीत. काळ बदलला आहे, त्यानुसार आपण बदलायला नको का ?

ज्या ठिकाणी सूर्य सहा सहा महिन्यात दिसतंच नाही, अशा ठिकाणी रहाणाऱ्या लोकांनी कोणता नियम पाळायचा ?
जिथे सूर्य नाहीच दिसत त्याठिकाणी अन्य नियम वापरू शकतो. पण जिथे सूर्य दिसतोय तिथे तर या जेवणाच्या वेळा पाळायला सुरवात करूया. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आम्ही पहिल्यांदा शंका घेणार. “कसं शक्य होणार ? हे असं लवकर जेवणं जमणारच नाही.” सुरवातीलाच नकारघंटा वाजवली की पुढे सगळं चुकतंच जात ना. मग काही करावसं वाटत नाही.

या वेळा पाळणे तर्कसंगत नाही, व्यवहार्य नाहीत. हे एकवेळ मान्य करूया. पण पचन होण्यासाठी लागणारी उर्जा कुठुन आणणार ?

विज्ञानाने बाकी सगळी सोंग आणता येतील पण सूर्याचा प्रकाश आणि त्याची शक्ती तर आणू शकणार नाही ना. शेवटी कुठेतरी निसर्गाला शरण जायलाच हवं ना !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..