नवीन लेखन...

जेवणाची योग्य वेळ कोणती – अंतिम भाग 20

घड्याळ दोन तास पुढे करा.

जेवणाची वेळ सायंकाळी सात वाजता करणे हे
“आताच्या प्रमाणित सरकारी वेळेनुसार शक्य नाही.”
प्रत्येकाचा हाच एक प्राॅब्लेम.
त्यालाही एक पर्याय सुचवतो.
आपले राष्ट्रीय घड्याळ दोन तास पुढे करावे. म्हणजे काही प्रश्न आपोआपच सोडवले जातील.

मी त्या क्षणाची वाट पहातोय, जेव्हा मा. पंतप्रधान मोदीजी रात्री आठ वाजता, कधीतरी रात्री राष्ट्र के नाम संदेश घोषित करतील….

“मित्रो, उद्या सूर्योदयापासून सरकारी कार्यालयांची वेळ बदलण्यात आली असून राष्ट्रीय घड्याळ दोन तास पुढे सरकवण्यात आलेले आहे. साडेदहा ऐवजी सकाळी साडेआठला सरकारी कार्यालये सुरू होतील. आणि सायंकाळी साडेपाच ऐवजी 3.30 ला सर्व कार्यालयातील कामकाज थांबेल. जास्तीत जास्त उशीरा म्हणजे 4 वाजेपर्यंत पर्यत काम होईल. त्यानंतर सर्व सरकारी कामे बंद करण्यात येतील. त्यामुळे घरी यायला कोणतेही कारण उरणार नाही. साडेपाच ते सहापर्यंत सर्वजण घरी पोचतील. आणि पुढील एक तास जेवण बनवण्यात खर्च होऊन सात वाजता जेवण आटपेल. साडेसातला स्वयंपाकघरात कोणी गेल्यास जेवण मिळणार नाही. कुलुप लावण्यात यावे. घरातील स्त्री पुरूषांनी त्यानंतरचा वेळ सामाजिक कामांसाठी खर्च करावा. काळ वेळ ओळखून बागेत, देवळात, प्रयोगशाळेत, वाचनालयात जरूर जावे. विशेषतः महिला वर्गाने स्वतःसाठी स्पेस घ्यावी.
चूल, मूल, रांधा,वाढा, उष्टी काढा या जोखडातून बाहेर पडावे. साडेसात ते रात्रौ साडेदहा पर्यतचा वेळ फुल्ल फॅमिली टाईम.”
रात्रीची लास्ट लोकल दीड ऐवजी 12 वाजता असेल.

असं केल्याने पहाटे उठावे लागेल, भूक लागूनच जाग येईल, आपोआपच ब्राह्म मुहूर्तावर उठणे होईल. दिनचर्या वेळेत सुरू होईल. माॅर्निंग वाॅक बंद. त्याऐवजी दहा पंधरा मिनिटं प्राणायाम योगासाठी देता येईल.
नाश्त्याला काय असा प्रश्नच पडणार नाही. त्याऐवजी जेवणाचीच तयारी करावी. जेवूनच बाहेर पडावे. शाळा, ऑफीस, बॅका, पोस्ट, दुकाने, माॅल, सरकारी दवाखाने, कोर्ट, संसद कामकाज नऊला सुरू झालेले असतील. जेवणाचा डबा फार जणांना न्यावाच लागणार नाही. अगदी हलका फुलका नाश्ता किंवा उत्तम प्रतीचे फळ दुपारी खावे. ते सरकारकडून पुरवण्यात येईल.

सायंकाळी नंतर या सर्व सरकारी आस्थापने बंद झाल्याने वीजेची प्रचंड प्रमाणात बचत होईल. भारनियमन कायमचे बंद होईल. पहाटे लवकर उठायचे असल्यामुळे रात्री लवकर झोपणे होईल, त्यामुळे झोप पूर्ण होईल.
फायदेच फायदे होतील….

म्हणून,
“मेरे प्यारे देशवासीयोऽऽ, ये बदलाव किसी राजकीय स्वार्थ से नही, बल्की आपकी याने आपके देह की रक्षा केलिऐ और मेरे देश की रक्षा के लिए बहोत जरूरी है, मेरी आपसे गुजारीश है, मुझे सिर्फ एकसो बीस दिन यानी तीन महिना दिजीए, आपको बदलाव जरूर दिखेगा, जिंदगीभर की यातायात, और दवाओ का काला बाजार हमेशा केलिए बंद हो जाएगा.
बस्स मुझे आपका सहयोग चाहिए । अपने लिए, अपने परिवार केलिए और अपने देश केलिए कुछ करने का, कुछ कर दिखाने का समय आ गया है ।
मित्रो, मुझे पूरा भरोसा है, आप मेरा साथ जरूर दोगे, शुरूवाती के दिनो मे आपको तकलीफ जरूर होगी, लेकीन आपकी सेहत मे काफी सुधार आएगा ।
सुबह जल्दी उठने की वजह से दो लोगों की मौत….
दवाईयों का कारोबार खत्म होने से अस्पताल पडे सुने…..
घरेलू और सरकारी स्तर पर लाईट बिल मे भारी कमी की वजह वीज वितरण कंपनी मे भारी हडताल….
मोदीनी सत्तर वर्षाची जुनी परंपरा मोडीत काढली….
आयुष मंत्रालय को सख्त आदेश जारी। सभी आयुष अधिकारी चुस्तफुस्त दिखने लगे ।

ऐसी ब्रेकींग न्यूज आपको मिडीया दिखाएगा, पर इनपर भरोसा मत करना ।

खुद को पहचान कर, अपने आप मे जो बदलाव आप महसूस करेंगे वो आपके अपनो केलिए बडे अच्छे साबीत होंगे।

नई सोच के साथ भारत आगे जा रहा है, मेरा भारत बदल रहा है, अच्छे दिन आ रहे है ।

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..