M e m o r y
केळकर, आंबेकर, करवंदे, जांभळे, फणसे, गरे, काकडे, भोपळे, कापसे, गाजरे, पोफळे, बोरकर, आपटे या व अशा अनेक मुल-मुलींमुळे बालवाडीपासूनच आमची शाळा फळे-फुले-पानांनी अक्षरशः बहरलेली असायची. कोणी एक प्राजक्ता माळींची आमच्या शाळेत नेमणुक काय झाली, बातमी गावात पसरली आणि लगोलग गुलाबराव फुले शाळेत पीटी शिक्षक म्हणून रुजु झाले तर नारळीकरांची निवड नावाचा महिमा लक्षात घेऊन विज्ञान शिकवण्यासाठी झाली.
फळाफुलांनी बहरलेल्या या शाळेचा संस्थापनदिनही एप्रिल फुल होता. तिथेही फूल आलच!
सहज एकदा चौकशी केली तर कळलं बागायत जमिनीवर शाळा उभारल्याचं हे फळ होत.
— प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply