‘फिरंगी’ हा शब्द आपण परदेशी लोकाकरता, विशेषत: इंग्रजांकरीता वापरतो. ‘फिरंग’ हा ‘फ्रेन्ड’ या शब्दाचा त्याकळच्या देशी जनतेने केलेला अपभ्रंश आहे.
इंग्रजी अंमलाच्या काळात रात्रीच्या वेळेस लोक तसंच काही काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नसतं..रात्रभर पोलिस पेट्रोलिंग सुरू असायचं..आतासारखे स्ट्रीटलाईट तेंव्हा सर्रास नव्हते, किंबहूना नव्हतेच.
रात्रीच्या समयास येताजाता कोणा व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या की पोलिस,”हू कम्स देअर?” असं जोरात दरडावून विचारायचे. मग समोरचा माणूस तेवढ्याच जोरात, “फ्रेन्ड” असं उत्तर द्यायचा..मग जुजबी चौकशी करून पोलिस पुढे व्हायचे.
इंग्रजी काळात अधिकारी गोरे असले तरी खालच्या स्तरावरचे शिपाई देशीच असतं..त्यांना इंग्रजी शब्दांचे उच्चार नीट जमत नसत..तेंव्हा त्यांनी ‘हू कम्स देअर?’ चं “हुकम्सडर” असा अपभ्रंश केला तर ‘फ्रेन्ड’चा ‘फिरंग’..!
या ‘फिरंग’चा पुढे ‘फिरंगी’ होऊन ‘Friend -मित्रा’च्या ऐवजी ‘शत्रू’ (पक्षी इंग्रज) असा अर्थ त्या शब्दाला प्राप्त झाला..
— गणेश साळुंखे
Leave a Reply