रोज सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठणे अत्यंत आवश्यक आहे. उशीरापर्यंत झोपून रहाणार्याचे नशीब सुद्धा झोपूनच रहाते. जागे होताच कोणत्या नाकपूडीतून श्वास सुरू आहे ते पहा. डाव्या नाकपूडीतून श्वास सुरू असेल तर डावा तळहात चेहर्यावरून फिरवत, उजवा पाय जमीनीवर प्रथम टाकावा. उजव्या नाकपूडीतून श्वास सुरू असेल तर उजवा तळहात चेहर्यावरून फिरवून डावा पायाने जमीनीस स्पर्श झाला पाहिजे. दोन्ही नाकपूडीतून श्वास सुरू असेल तर दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून चेहरा तसेच सर्वांगावर फिरवावेत आणि फक्त एक नाकपूडीतून श्वास सुरू झाला की मगच जमीनीवर पाय टेकवावा.
आपण श्वास घेतला की शरिरात सर्वत्र उर्जा खेळते. व्यक्तीच्या अंगात शेवटचा श्वास असेतोवर तो जीवंत आहे असे मानतात. अजूनही शास्त्रज्ञ मृत्यू म्हणजे काय? आत्मा आहे का? प्राण जातो म्हणजे नेमके काय होते? जन्मवेळ नेमकी कुठली? पोटात भ्रूण हालचाल जाणवते ती कि बाहेर आल्यावर प्रथम श्वास घेतला जातो ती? खरंच योग अध्यात्माबाबत आताचा समाज अत्यंत निष्क्रिय आहे. मला वाटते,प्रत्येक घरात याविषयीचे किमान प्राथमिक ज्ञान तरी असले पाहिजे.
आपल्या पाठीचा कणा 33 मणके असलेला. बेंबी पासुन पसरलेल्या 73 हजार नाड्या, पाठीच्या कण्याचे खालचे टोक तिथे कुंडलीनी शक्तीचा निवास. तेथून निघणाऱ्या मुख्य नाड्या 24. आपल्या शरीरात असलेल्या नाडी जंजाळातील सर्वात महत्वाच्या 10 नाड्या आणि आपण सहज समजू अशा 03 मुख्य नाड्या. ईडा नाडी – शरीरात डाव्या बाजूला. पिंगला -शरिरात उजव्या बाजूला आणि सूष्मना-शरीरात मध्यभागी. जेव्हा श्वास डाव्या नाकपूडीतून सुरू असतो त्यास चंद्र स्वर आणि जेव्हा श्वास उजव्या नाकपूडीतून सुरू असतो तो सूर्य स्वर. दोन्ही नाकपूडीतून चालणारा तो शंम्भू स्वर. हे स्वर तिथीप्रमाणे आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कसे बदलतात ते पुढे एक तक्ता देईल तेथे पहा.
थोडक्यात सांगायचे हे की, मनुष्यजीवन सर्वस्वी या श्वास पद्धतीवर अवलंबून आहे. नियंत्रित श्वास हा अतिशय आवश्यक असा विचार आहे.श्वास नियंत्रणाने आपण हवे ते साध्य करु शकतो आणि श्वासावरचे नियंत्रण सुटले तर आयुष्याची माती सुद्धा होवू शकते. आपण हे श्वास नियंत्रण कसे करावे ते प्राणायाम प्रकरणात त्याबद्दल अधिक माहिती घेवू. सध्या एकच सांगणे कि, आपण आपला श्वास अत्यंत शांत कसा राहील यावर लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही कामात श्वास गती अवास्तव वाढणार नाही याकडे लक्ष द्यावे.
ज्याने श्वास जिंकला त्याने जग जिंकले.
धन्यवाद..
(संकलन-वेदिका हेल्थ सप्लिमेंट्स ,औरंगाबाद)
(आरोग्यदूत या Whatsapp ग्रुपच्या सौजन्याने)
नमस्कार.
श्वासाबद्दलची छान माहिती. योगामध्ये अशी संकल्पना आहे की, प्रत्येक व्यक्तीनें जीवनात किती श्वास घ्यायचें, हें fixed & pre-determined असतें, त्यामुळे, श्वासावर जेवढें नियंत्रण, श्वास जेवढा slowly घेतला जाईल, तेवढें त्या व्यक्तीचें आयुष्य वाढेल, (असें Yoga म्हणतो ). आणि प्राणीसृष्टीत पाहातां तें पटतेंही. हळूळू( slowly) श्वास घेणार्या कासवाचें आयुष्य बरेंच असते , Sea-turtlesचें तर कांहीशे वर्षें असतें, तर कुत्र्याचे पंधराएक वर्षेंच असतें.
– सुभाष स नाईक