" ऐ , ऐक ना " " त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . " " मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . " " ओके " . " पाठवला . " " बघितला . " " Delete केलास " " तू काय आहेस ? फोटो पाठवलेला आवडला का ते तरी निदान आधी विचारायचं ? " " प्लीज़ सांग ना . delete केलास . " " खरं म्हणजे अतिशय जीवावर आलं होतं . पण केला फोटो delete . काय अप्रतिम फोटो आहे ! ज्याचा आहे आणि ज्याने काढला आहे अशा दोघांनाही full marks . " " खरंच आवडला ? " " अगदी मनापासून . म्हणून तर delete करायच अगदी जीवावर आलं होतं . पण तू delete का करायला सांगितले ? मधेही एकदा असंच एक फोटो delete करायला सांगितले होतेस . " " कारण याआधी पाठवलेली selfi फक्त तुझ्यासाठी होती . तू पाहिल्यावर आणखी कोणी पाहायलेली मला आवडले नसते . चाललेही नसते . " " Selfi काही vulgar अवतारात नव्हती . " " चावटपणा नको . तसा हा फोटोही काही vulgar नाहीये . आणि तसे फोटो पाठवायला ना आपले ते वय आहे , ना आपली तशी व्रुत्ती . " " धन्यवाद माताजी . पण हा फोटो का ? झकास फोटो . अगदी सालंकृत . छान भरजरी साडी आणि मोजकेच पण ठसठशीत दागिने . " " म्हणूनच delete करायला सांगितले . मला दागिने जरासुद्धा आवडत नाहीत . " " नशिबवान आहे नवरा . माझ्यासारखा " . " हा थट्टेने घ्यायचा विषय नाही . अक्षरशः सक्ती केल्यासारखे मागे लागून हा फोटो काढला गेलाय . " " ओहो हो . . . म्हणून पापड मोडलाय का बाईसाहेबांचा ! जबरद्स्तीचा पुरावा नाही उरता कामा मागे . " " प्लीज़ . तुला पाठवायलाच नको होता फोटो . कुठचाच . " " मस्करी नाही करत . पण खरंच सुंदर . . . . मान अजून जरा इकडे केली असतीस तर कानातले आणखी छान आले असते फोटोत . नाहीतरी एकच साइड आहे ना " " अजून नाही का काही " " रागावनार नसशील तर सांगतो . " " सांगा महाराज . आता तुमची सक्ती . " " स्वतचे कौतुक ऐकायचे असले तर तसं मोकळेपणाने सांगावे माणसाने . " " तू म्हणजे ना . . " " साडीला matching म्हणून लाल चंद्रकोर हे बरोबर . पण मग त्या लाल चंद्रकोरीत काळा छोटा टीळा हवा . खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका . आणि त्या चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको ; पण ठळक हवी . ती रेषा जाडी नको ; पण भरदार हवी . नजरेत पटकन भरेल अशी . " " अजून काही प्रिस्क्रिप्शन ? " " चंद्रकोरीची रेषा भुवई खाली वळते तिथपासून दुसऱ्या भुवईच्या खाली वळते तिथपर्यंत बेस सारखी हवी . आणि दोन भुवयान्च्या बरोबर मधे तौ लाल कुंकवाचा ठिपका . दोन भुवयान्च्या मधे जिथे नाकाच वरचे टोक संपते तिथे हा ठिपका हवा . परातीत चंद्राचे प्रतिबिंब पडाव तसा . नाहीतर कड़वा चौथ ला चाळणीत चंद्र दिसावा तसा . " " आता हे काय ? " " वेडाबाई , ही चंद्रकोर माझा पति किती प्रेमाने मला साथ देतो याचे प्रतीक आहे . त्याच्या भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे याचे स्म्रुतिचिन्ह म्हणून तो लाल कुंकवाचा ठिपका . अगदी लांबून सुद्धा लक्ष वेधून घेईल असा . आणि चंद्रकोर म्हणजे माझ्या भावविश्वाला त्याची साथ पुरवते ते कोंदण . चंद्रकोर आणि हा टीळा म्हणजे परस्पर प्रीतीचा कळस आणि ध्वज असतो ग . " " सॉलिड आहे हे . " " तसं नाही ग . हे संकेत समजून घेणं फार छान असते ग . काय आहे ना आपण एकमेकांवर प्रेम करतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे असतेच ; पण ते कसे करतो , कशासाठी करतो हे नाजूकपने सूचित करता येणं हेही तितकेच महत्वाचे असते . " " म्हणजे ? " " आपल्या पिढीत प्रेम वाटण्याची सुद्धा एक परिमीति असते . लगेचच delete केलेला फोटो पाहताना मला ते सारखे आठवत होते . " "हे काहीतरी वेगळेच सुरु आहे तुझे आज . " " अलग होंगे ; मगर गलत नही " " डायलॉगबाजी पूरे . जरा ढील द्यायचा अवकाश की झाले सुरु . वेगळी परिमीति म्हणजे तुला काय म्हणायचे ते सांग . " " आपल्या पिढीची प्रेमाची तर्हा जरा भिडस्त आहे आजच्या पिढीच्या मते . " " म्हणजे ? " " आपल्या पिढीच्या प्रेमाचे फोटोच वेगळे आहेत . एक तर ते श्रीमान योगी कादंबरीतल्या शिवाजी महाराज - सईबाई सारखे आहे . . उमलत्या कर्तुत्वाच्या काळात उमलत गेलेले . नाहीतर ते " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकातल्या संभाजी महाराज - येसूबाई सारखे . एकमेकांच्या कर्तुत्वाचा आदर करत व्यक्त होणारे . . . . " स्वारीचे हे रूप , स्वारीचे हे तेज , स्वारीचा हा पराक्रम " अशा शब्दांत एकमेकांविषयी व्यक्त होणार . . . . आंधळी आपुलकी नाही तर आदरयुक्त , अभिमानपूर्न खानदानी आत्मीयता . दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून विकसित होत जाणारे . एकमेकांविषयी कौतुक आणि आदर असणारे . गाण्यात कसे प्रत्येक कडव्यां नंतर ध्रुवपद येते तसे . प्रत्येक टप्प्यावर ही आठवण काढणारं . उगाचच नाही " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकाचा प्रत्येक अंक " स्वारीचे हे रूप , स्वारीची ही जिद्द . . . . " या वाक्यानी संपत . एकाने पुढच्यासाठी शब्दांत घातले तर पुढच्याच्या भावना पहिल्याविशयी कुठे वेगळ्या असतात ? " " अगदी खरं आहे रे हे " " तिसरा प्रकार म्हणजे " स्वामी " कादंबरी तल्या थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई सारखे . अकाली करपलेल्या कर्तुत्ववान जीवनातील मोजक्या क्षणांची शिदोरी देणारे . आठवणही येऊ नाही अशा अनेक क्षणांचे डाग इतरजण आयुष्याच्या अन्गरख्यावर उडवत असताना आठवणीने आठवणीत ठेवावे असे काहीतरी क्षण पदरात घालत असे प्रेमाचे डाग मिरवावेत असे . " " परत नाही म्हणणार उगीच पाठवले फोटो म्हणून् " " तसं नाही ग . मला माझ्या पत्नीचा विचार करताना नेहमीच असं वाटत असत " " पटलं मला " " ती चंद्रकोर , तो ठिपका , तो नाकाच्या शेंडयावर बसलेला लटका राग हे वैवाहिक आयुष्याचे फार छान फोटो आहेत . सहवासाच्या कमेर्याने काढलेले . फक्त एकमेकांनाच दिसणारे . पॉज़िटिव फोटो आणि नेगेटिव रील एकांतात उलगडणरे आणि जनांत सुचवनारे . मैफीलीत श्रोत्यांना नाही जाणवत तानपुर्याचे स्वर फारसे . पण गायक अस्वस्थ असतो त्यान्च्याशिवाय . असे हे क्षण , श्रुंगार - संकेत आयुष्याचे तानपुरे असतात . ते सदैव सुरातच हवेत . इतरांना दिसणयासाठी नाही तर आपल्याला जाणवण्यासाठी . " " क्या बात हैं ? " " अजून एक सांगू ? " " विचारू नकोस . सांगत राहा . " " असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात . ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे . या आणि अशा फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ? प्रेम असते म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! " " तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन . " " त्याची royalty म्हणून् नाही . पण एक विनंती आहे . " " मी हे delete करणार नाही . " " मी काहीही delete करायला सांगत नाहीये . " " मग ? " " या फोटोच्या रंगीत प्रती काढल्या जातीलच . साहजिकच आहे ते . पण या फोटोची निदान एक तरी Black - white अशी प्रत काढ . " " का रे ? " " रंगीत फोटो मधे सौंदर्याचे सौष्ठव आले तरी भावनेच मार्दव येत नाही . त्यासाठी कृष्ण - धवल च फोटो हवा " " I see ! आता लक्षात येतय माझ्या ! ! सोनचाफ्याचा , बकुलिचा सुवास आवडता असूनही पहिल्यापासून प्राजक्त आणि मोगरा ही तुझी नम्बर एकची आवड का ? आणि मी एकदा तुला वेड्यासारखे म्हणले होते की प्राजक्ताच्या ओलसर फुलांचा डाग पडतो . " " तेंव्हा नाही सांगितले काहि . पण आज सांगतो . ओल्या प्राजक्ताचा डाग नाही पडत . भावविभोर मनाने त्या क्षणाचा , त्या सहवासाचा तो काढलेला फोटो असतो . प्राजक्ताचा देठ म्हणून लाल असतो . हिरवा नसतो . हिरवा रंग असोशीचा असतो ; लाल सन्त्रुप्तीचा . ज्या व्यक्तीच्या सहवासाने आपण त्रुप्त होतो , त्याच्या आठवणीने गालावर , मनावर लाली येते . त्या स्म्रुतीन्च्या उजळणीचा फोटो म्हणजे तो प्राजक्त . प्राजक्त ही ओलसर आणि भावना ही . " " किती वेडा आहेस रे " " नाही . दिवसाची खरी यथार्थता तिन्हिसान्जेलाच कळते . आकाशात मावळतीचे रंग पखरलेले असतानाच मनाच्या कॅमेरयात गवसलेल्या आणि निसटलेल्या क्षणांची सरमिसळ सुरु असते . म्हणून् तर त्याला कातरवेळ म्हणतात . " " हा फोटो नाही विसरू शकणार " " अग , असे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथी सारखे असतात . नाकाचा शेनडा पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडनारा . नथीचा हेवा वाटतो असे मोकळेपणाने सांगत राहतात हे फोटो " " तूच एक . . . " -- चंद्रशेखर टिळक २ डिसेंबर २०१६
9820292376
Email: tilakc@nsdl.co.in
Leave a Reply