उगवले होते जंगलात ते उंच माळावरी
रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी ||
जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी
खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी ||
वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे
ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें ||
वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा
स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा ||
कुणीतरी आला वाटसरु तो घेउन गेला त्याला
बागेमधल्या कुंडीमध्ये मान तयाचा झाला ||
खतपाणी भरपूर असूनी मुंग्या किडे नव्हते
आधूनिकतेची दृष्टी ठेवूनी वाढवित त्यास होते ||
डेरेदार डौलदार भरगच्च भासला तो आता
परि स्वातंत्र्याच्या जीवनाला कात्री लागून जाता ||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply