आज आजची १४.०३.२२ ही तारीख आपण अशी लिहीत असलो तरी अमेरिकेत ती ०३/१४/२२ अशी लिहीतात. या तारखेतले पहिले तीन आकडे पायच्या ३.१४ या पहिल्या तीन आकड्यांशी जुळतात.
स्वल्पविरामऐवजी टिंब वापरले, तर दशमान पद्धतीने हा ३.१४ असाही लिहिला जातो. ‘पाय’ या आकड्यासाठीचे सांकेतिक चिन्ह म्हणून ग्रीक वर्णमालेतील २४ अक्षरांपैकी १६ वे अक्षर हे ‘पाय’ आणि ते आता ३.१४ किंवा २२/७ या संख्येसाठी जगन्मान्य झालेले आहे. त्यामुळे हा दिवस ‘पाय डे’ म्हणून साजरा केला जातो.
दशमान पद्धतीऐवजी हीच ३.१४ संख्या व्यवहारी अपूर्णांकात २२/७ अशी लिहिली जाईल. भौतिक शास्त्रज्ञ असलेल्या लॅरी शॉ यांनी सर्वप्रथम १९८८ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोधील एक्सप्लोरेटोरियम मध्ये पाय दिवसाचे आयोजन केलं होतं. त्यांना “The Prince of π” या नावानेही ओळखलं जातं. २००९ साली संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या प्रतिनिधींनी 14 मार्च हा दिवस पाय दिवस साजरा करण्यात यावा अशी मागणी केली. त्या आधी पाय दिवस हा जुलै महिन्याच्या २२ तारखेला साजरा करण्यात येत होता. पायची दुसरी किंमत ही 22/7 अशीही आहे.
प्रिन्सटन, न्यू जर्सीच्या वतीनं पाय दिवस आणि अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्मदिवस संयुक्तपणे साजरा केला जातो. आईनस्टाईन यांनी आपल्या आयुष्यातील 20 वर्षापेक्षा जास्त काळ हा प्रिन्सटनमध्ये घालवला.
नद्यांची लांबी मोजण्यासाठी पाय चा उपयोग होऊ शकतो. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी पायचा वापर करुन नद्यांची लांबी मोजण्याचा प्रयत्न केला होता. पायचा वापर करुन गणिततज्ज्ञ पिरॅमिडचा आकार मोजला जातो. अवकाशातील दोन ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी, त्यांच्यातील अंतराचा हिशोब लावण्यासाठीही पायचा उपयोग होऊ शकतो. पायच्या किंमतीचा वापर करुन आपण आपल्या ब्रम्हांडचा आकार अंडाकार आहे या तथ्यापर्यंत पोहोचलो आहे. स्पेस सायन्समध्ये π चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय.
पायची किंमत ही 22/7 म्हणजेच 3.141592653589793238….. अशी अनंत आहे. जगातल्या अनेक शाश्त्रज्ञांनी याच्या निश्चित मूल्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला पण अद्याप कुणालाही यश आलं नाही. भारतात आपण प्रथम दिनांक लिहितो व नंतर महिना लिहितो, त्यामुळे तसे पाहता आपल्याकडे २२ जुलै हा दिवस ‘पाय’ दिवस म्हणून साजरा करायला पाहिजे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply