नवीन लेखन...

पाइड किंगफिशर (कवड्या खंड्या)

खंड्या ( Kingfisher ) पक्षाच्या डझनभर प्रजाती आहेत. त्यातल्या नऊ भारतीय उपखंडात आढळतात. पुन्हा त्यातील आपल्या कोकण पट्टीत दिसून येणारे म्हणजे White Breasted Kingfisher, Common Kingfisher, Pied Kingfisher आणि जुलै ते ऑकटोबर मधे दिसणारा Oriental Dwarf Kingfisher ( हाच तो रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आलेला तिबोटी खंड्या).

या चारपैकी तिन प्रकारच्या खंड्यांचे फोटो काढायचे अनेक योग आले परंतु Pied Kingfisher ( कवड्या खंड्या ) मात्र मला नेहमीच हुलकावण्या देत आला. काही वर्षांपूर्वी पेण जवळ भोगावती नदीच्या पुलावरून याचे दर्शन झाले होते. वेळ मिळताच कॅमेरा घेऊन तिथे तिष्ठत बसलो. दिसला, पण तेव्हा लांब असल्याने चांगला फोटो काढायला जमले नाही.

फार्मच्या रस्त्यावर जरा अलीकडे, गावातच एक ओढा आहे. त्यावरच्या पुलावर गाडी थांबवून डावी उजवीकडे नजर टाकली की Common Kingfisher किंवा पुलाखाली छताला घरटे बांधून असलेल्या Wire Tailed Swallow ( तारवाली ), विजेच्या तारांवर बसलेले आढळतात. त्यामुळे कॅमेरा हाताशी असतोच.

गेल्या आठवड्यात , तुलनेने मोठ्या चोचीचा , डोक्यावर किंचित तुरा असलेला विहंग तारेवर बसून पाण्याकडे नजर रोखून बसलेला पाहिला.

” Pied KF की काय !”

प्रथम गाडी बंद केली. आवाज न करता खाली उतरलो. तेवढ्यात महाराजांनी हवेत उडी घेऊन पंख फडफडवत हवेतच स्थिर होऊन खाली पाण्यातील भक्ष्यावर नेम धरला आणि स्वतःचा बाण करून पाण्यात सुळकांडी मारली. अशी पद्धत ही कवड्या खंड्याची खासियत म्हणाना ! दुसऱ्याच क्षणाला पुन्हा तारेवर विराजमान होऊन पंख झटकायला सुरुवात केली. तो या व्यवधानात मग्न असताना मी चार पाऊले पुढे सरकून घेतले. ओले पंख साफ करण्यासाठी त्याची चोच पंखाखाली गेली तसा कॅमेरा फोकस केला. “उडू नको रे बाबा. एकच फोटो काढू दे ” … मनातून विनवणी चालू होतीच. त्याने जाणले असावे. डौलदारपणे माझ्याकडे वळलेली नजर आणि माझी “क्लिक” … एकच गाठ पडली. .. Pied Kingfisher कॅमेरा मधे बंदिस्त करायची बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण झाली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..