लोंबकळलेल्या खाली शेपट्या,
पिल्लू मौज करे कशी,—?
शोधक बुद्धी, चौकस नजर,
अफलातून फळते अशी,–!!
युक्ती,शक्ती, बुद्धी,
जिवाला आहे देणगी,
सदुपयोगाने करा किमया,
मौजेने जगा,ही वानगी,—!!
दिसे पिल्लू छोटेसे,
तरी मस्त आहे कल्पनाशक्ती,
आरामात कसे झोके घेई,
दुनियाच भासे त्यास छोटी,—!!
डोळे मिचकावत, पिल्लू बघते
आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे,
भरभरून लुटेन आनंद मी,
सोडवेन निसर्गाचे अनवट कोडे,!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply