नवीन लेखन...

वैमानिकांचे प्रशिक्षण महागडे तरी महत्त्वाचे…

सामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, एवढा भरमसाठ पगार घेऊन हे वैमानिक लोक संप का करतात? मुळात यांना एवढा पगार का देतात? त्यांच्या प्रशिक्षणावर एवढा खर्च का करावा लागतो? या सर्वांचे उत्तर एकच. ते म्हणजे त्यांचे उत्तरदायित्व.

किमान २५०-३०० प्रवाशांना हवाई प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा हे वैमानिकाचे प्रथम कर्तव्य असते. (यात लढाऊ विमानांच्या-वायुदलातील वैमानिकांची गणना केली नाही.) जरी तंत्रज्ञान सुधारले असले, विमानात एकाच प्रकारच्या नियंत्रणासाठी किमान दोन दोन प्रणाली (फॉल बॅक सिस्टिम) असल्या तरी ज्यावर नियंत्रण नसते अशा तांत्रिक चुका होऊन विमानाला अपघात होऊ शकतो.

विमानात काही बिघाड झाला तर आणि तसा तो अनेक प्रणालीत होऊ शकतो. उदाहरणार्थ हायड्रॉलिक सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक सिस्टिम, इंजिने आणि इंधन प्रणाली, इंधन तेलाची गळती, रबर सीलचे अपयश आणि आपतकालिन परिस्थिती हे धोके असतात.

आगगाडी, मोटार कार आणि बोटी यांच्या तुलनेत विमान का धोक्याचे तर इतर वाहने बिघाड झाल्यावर आपण वाटेत थांबवू शकतो आणि दुरूस्त करू शकतो, पण विमान असे हवेत उभे करता येत नाही. त्यामुळे अशी धोक्याची परिस्थिती उद्भवल्यावर ती हाताळणे हे वैमानिकाच्या कौशल्यावर अवलंबून असते. हे असे नैपुण्य त्याला आपल्या प्रशिक्षणातून आणि अनुभवातून मिळवावे लागते. एका वेळी एकापेक्षा अधिक धोके उद्भवल्यास वैमानिकाचे कसब पणाला लागते. हे सर्व त्यांना त्यांच्या प्रशिक्षणात शिकविले जात असल्याने प्रशिक्षण दीर्घ कालाचे आणि म्हणून महागडे होते.

हे शिक्षण जास्त करून प्रत्यक्ष विमानावरच होते. फार थोडा भाग सिम्युलेटरवर होतो. विमानाचे प्रशिक्षण किती तास घ्यायचे हे त्या त्या अभ्यासक्रमावर अवलंबून असते. इंधनाची किंमत अव्वाच्या सव्वा वाढल्यानेही प्रशिक्षणाचा खर्च वाढला. फ्युपिल पायलट, कमर्शियल पायलट असे परवान्याचे वेगवेगळे अभ्यासक्रम असतात. प्रत्येक वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा खर्चच मुळी ३० ते ३५ लाख रुपये येतो.

– डॉ. अविनाश वळवडे, पुणे
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार

1 Comment on वैमानिकांचे प्रशिक्षण महागडे तरी महत्त्वाचे…

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..