दिसा दिसांचे ते भाग्य सरले,
आला ऽ भरुन पिसाट वारा ।
माझा कुणा म्हणू मी,
उरले न मोल आसवांना,
उरले न मोल आसवांना ।।धृ।।
अपुलेच झाले परकेचि केव्हां,
कळले न या वेड्या मनाला ।
तंद्रीतुनि निझेच्या जाग आली,
वेळ केव्हांच होती निघून गेली ।
कवटाळीतो शुष्क भावनांना ।।१।।
दिले भरभरुन हातचे न ठेवुनि,
शल्य ना, भरली ओंजळ आसवांनी ।
घेतला निरोप मृदु भावनांनी ।
भरले आयु, अंतहीन यातनांनी ।।
स्मरणे नित हळव्या स्पंदनांना ।।२।।
वाचा नसे या मनींच्या व्यथेला,
कितीदां समजाविले खुळ्या मनाला ।
घडी मनाची ती, जाउणिना सत्याला,
नसे इलाज आतां नाईलाजाला ।।
दयाघना, दे सामर्थ्य या मनाला ।।३।।
-गुरुदास / सुरेश नाईक
१९ नोव्हेंबर २००९,
१०/११, “राधा-निवास”
मुंबई ४०००८१
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply