‘आई, मी कॉलेजला निघाली; तू रातराणीला पाणी घातलं का?” स्नेहल टेबलावरची पुस्तकांची बॅग उचलत म्हणाली
‘हो टाकलं बाई, आणि हो टेबलावर नाश्ता ठेवला आहे तो करून जा’ किचन मधून स्नेहलची आई सवितांनी आवाज दिला
‘नको गं आई, मला कॉलेजला जायला उशीर होतोय’
‘थोडा वेळ थांबलीस तर काही फरक पडत नाही’
हे सकाळचे रोजचे संवांद झाल्याशिवाय दिवस उजाडतच नव्हता
रमेश पोतदार आणि सविता पोतदार यांची एकुलती एक मुलगी, सधन कुटुंबात लाडात वाढलेली, आजच्या ग्लोबल जगात हि तिने मर्यादा व सुसंस्कृत पण सोडला नव्हता, तसे दोघांनीही तिच्यावर केलेल्या संस्काराचा विसर पडला नव्हता तसे सर्व गुण तिच्या अंगात मुरलेले होते. तिचे पाय नेहमीच जमिनीवर होते
आई माझे घड्याळ आणि कॉलेज ची फी देते ना’ ती किचन कडे पाहत म्हणाली
‘हि पोरगी अशी आहे ना, कॉलेज मधून आली कि वस्तू, पुस्तक, इथे तिथे फेकून देते आणि सकाळी कॉलेज ला निघाली कि कुठे आहे म्हणून ओरडत बसते, सासरी हि असंच वाग’ आतून चहाचा कप घेऊन बाहेर आली
‘झाली हिची सुरुवात, माझ्या लग्नाशिवाय काहीच दिसत नाही’
‘ते बघ तिथे टेबलावर ठेवलय नुसता आरडा ओरडा’ चहाचा कप रमेश यांच्याकडे देत म्हणाली ‘घ्या चहा आज शनिवार, सुट्टी आहे ना म्हणून आरामशीर बसलेत
रमेश चहाचा कप हातात घेत म्हणाले ‘तुम्ही मायलेकी पाहून घ्या, माझ्यावर का रागावतात’
‘नाहीतर काय बाजुवाल्यांवर रागाऊ’ चेहऱ्यावर रागाचे भाव उठून दिसत होते
‘अग पण मी काय केलं’ चहाचा कप घेत म्हणाले
‘तेच तर म्हणतेय मी, तीच आता कॉलेज संपत आलं, आता स्थळं शोधायला सुरुवात करा’
‘अगं पण तिला पुढचं ही शिक्षण पुर्ण करायचं आहे ना’
‘पुढचं शिक्षण, शिक्षण काय चुलीत घालायचंय, जे शिकायला पाहिजे ते शिकत नाही’
‘आलीस का मूळ मुद्द्यावर, मी निघते नाहीतर अजून लेक्चर ऐकायला लागेल’ बाबांकडे पाहत हळूच हसत स्नेहल म्हणाली
रमेश हि हसले, ते पाहून सवितांचा हि पारा आणखीनच वाढला
‘हसा हसा, शिक्षण घेता घेता वय वाढलं कि ठेवा घरात बसवुन’ रागातच सविता किचन मध्ये निघून गेल्या
‘स्नेहल खरं म्हणजे तुझी आई बोलते ते एकार्थी खरं आहे’ पेपर वाचत रमेश म्हणाले
‘बाबा तुम्ही दोघींच्या बाजूने बोलता’ स्नेहल म्हणाली
‘नाही बेटा, तुम्ही दोघीही माझ्याच ना, मग कोणा एकाला दुखवून काय करणार’ पेपरचे पान पलटत म्हणाले
‘तुम्ही आता आईला फोलोअप करताहात’ रमेशच्या बाजूला बसत म्हणाली
रमेश यांनी पेपर मिटला आणि तिच्याकडे पाहिले
‘स्नेहल, अगं कितीही झाली तरी होम मिनिस्टर आहे’ रमेश म्हणाले
‘मग करा होम मिनिस्टरच्या ऑर्डर फॉलो करत, तुमची काहीच मत नाही का’ ती खोट खोट रागवत म्हणाली
‘आता कशी म्हणाली, आता शोभते एका कमिशनरची मुलगी, आम्हाला होम मिनिस्टरच्या ऑर्डर फोलो करायला लागतात ना, बरं तुला कॉलेजला जायला उशीर होतोय ना, संध्याकाळी आल्यावर बोलू’ रमेश म्हणाले
‘नक्की ना’ स्नेहल म्हणाली
‘हो सोना बेटा’ रमेश असं म्हणताच ती कॉलेज निघून गेली
तेंव्हा सविता बाहेर आली
‘झालं का बाप बेटीचं बोलणं, नुसती लाडावून ठेवलीय’ नवऱ्याकडे पाहत सविता म्हणाली
‘सविता, आपली ती एकुलती एक मुलगी आहे, कोणता बाप लाड नाही करणार’ रमेश म्हणाले
‘जो काय बाप लेकी ढिंगाणा घालायचा तो घाला, पोरीच्या लग्नाची काळजी मीच करायची, तुम्ही फक्त पेपर वाचा आणि शांत बसा’ सविता वैतागून म्हणाली
‘सविता तसं काही नाही. मलाही तिच्या लग्नाची काळजी आहे’ रमेश म्हणाले
‘काळजी असती तर तिला लग्नासाठी तयार केल असत’ सविता म्हणाली
‘हो पण ती मनापासून तयार व्हायला पाहिजे ना, तिला जबरदस्तीने कसं तयार करणार’ पेपर बाजूला करत रमेश म्हणाले
‘मला ते काही माहित नाही, तुम्ही लग्नासाठी विरोध केला ना मग बघा मी घर सोडून जाते कि नाही ते’ सविता कमरेला पदर खोचून म्हणाली
‘अगं हो हो, बस मी काय सांगतो ते निट ऐक, माझा एक माधव सरनाईक नावाचा मित्र आहे, त्याला पवन नावाचा मुलगा आहे, मी त्याला पाहिलंय, एमबीए केलं आहे, आपल्या स्नेहल साठी त्याच्याशी बोलणं केलं आहे, आणि ते तयार ही आहेत’ रमेश म्हणाले
ते एकून सविता खुश झाली
‘अहो मग त्यांना बोलवायचं ना’ सविता म्हणाली
‘हो हो, उद्या रविवार आहे ना, म्हणून उद्या त्यांना यायला सांगितलं’ रमेश म्हणाले
‘काय म्हणता, आणि हि आनंदाची बातमी माझ्यापासून का लपवून ठेवली’ सविता तांदूळ निवडत म्हणाली
‘तुला सांगणारच होतो, पण तुमचे सकाळी सकाळी प्रेमाचे संवाद चालू असतो ना, मग सांगणार केंव्हा’ हसतच रमेश म्हणाले
‘स्नेहलला सांगितलं का’ सविता म्हणाली
‘तोच विचार करतोय, ती तयार होईल का?’ रमेश म्हणाले
‘तयार करावीचं लागेल, आधीच सांगून ठेवते’ तांदळातले खडे बाहेर टाकत सविता म्हणाली
‘आता हि पण जबाबदारी माझ्यावरच का’ रमेश म्हणाले
‘ती माझं काहीच ऐकत नाही, तेंव्हा हे तुम्हालाच करावं लागेल’ सविता म्हणाली
‘ठीक आहे, संध्याकाळी आली कि बोलतो तिच्याशी, झालं समाधान’ हसत रमेश म्हणाले
‘आयुष्यात हे चांगल काम केलं’ सविता म्हणाली
‘वा, म्हणजे आता पर्यंत मी चांगली काम केलीच नाही का’ रमेश म्हणाले
‘मला तसं म्हणायचं नव्हतं, बरं मी जेवणाची तयारी करायला जाते’ तांदळाचे ताट घेऊन किचन मध्ये जात सविता म्हणाली
असं म्हणून त्या आत निघून गेल्या
स्नेहलला संध्याकाळी कसं समजवायचं याचा विचार रमेश करत होते
संध्याकाळचे सहा वाजले होते आणि सविताची नजर एकदा घड्याळावर आणि एकदा दारावर अशी चालली होती,
रमेश हे सर्व पाहत होते,
‘अगं येईल ती, असं पाहत राहून काय ती येणार आहे का, फोन कर तिला’ रमेश म्हणाले
‘फोन केला हो, पण कार्टी उचलेल तर ना, आईच्या जीवाला घोर लावून ठेवते नुसती’ तिला उशीर होतोय हे पाहून सावितांच्या मनाची घालमेल होतेय हे रमेश जाणून होते
‘अगं मग ती गाडी चालवत असेल, तू नको काळजी करू, येईल ती आता काय लहान नाही ती’ रमेश म्हणाले
‘लहान नाही म्हणून तर काळजी वाटते ना, तुम्हाला तर कसलीच काळजीच नाही’ सविता म्हणाली
ते हसतच दारात उभ्या असलेल्या सविताच्या कडे गेले
तेव्हढ्यात स्नेहल गाडी घेऊन बंगल्याच्या पोर्च मध्ये आली
‘ती बघ आलीच, नुसती काळजी करत होतीस’ रमेश म्हणाले
स्नेहल दारात उभे असलेल्या आईबाबांकडे पहिले,
‘काय झालं तुम्ही असे दारात का उभे’ स्नेहल स्कुटी स्टॅन्ड वर लावत म्हणाली
‘तुझीच वाट पाहत होतो’ रमेश हसत म्हणाले
‘काय बाबा पाच दहा मिनिट उशीर झाला तर काळजी कशाला करायची’ बॅग खांद्याला लावत म्हणाली
‘मी नाही करत, हीच करत होती’ हसत रमेश म्हणाले
‘आईला तर काळजी करायची सवयच आहे’ पायऱ्या चढत स्नेहल म्हणाली
तिघेही आत आले
‘तू फोन का उचलत नव्हतीस’ रागातच सविता म्हणाली
‘कसा उचलणार, गाडी चालवत होती ना’ हातातली पुस्तककांची बॅग टेबलावर ठेवत म्हणाली
‘तुला काय कळणार आईचं मन, त्यासाठी आई व्हावं लागत’ सविता म्हणाल्या
‘आलीस का चूल मुल या विषयावर’ अस म्हणून ती तिच्या रूम मध्ये निघून गेली,
‘तुम्ही उद्याच्या बघण्याच्या कार्यक्रमाबद्दल बोलून घ्या’ असं म्हणून सविता किचन मध्ये निघून गेल्या
स्नेहल फ्रेश होऊन बाहेर आली, बाबा कोचावर बसलेले पाहून ती त्यांच्या बाजूला येऊन बसली
‘बाबा वातावरण कसं आहे’ किचन कडे पाहत म्हणाली
‘सकाळी जसं होत तसचं’ दोघेही हसले
‘ये आई भूक लागलीय, काही खायला आहे का’ किचनच्या दिशेने पाहत स्नेहल म्हणाली
‘डब्यात चिवडा ठेवलाय तो घे’ किचन मधून आवाज देत सविता म्हणाली
‘दे ना’ स्नेहल म्हणाली
‘हिला ना सर्व गोष्टी हातात द्याव्या लागतात’ सविता वैतागत बाहेर येत म्हणाली
सविता आतून डिश मध्ये चिवडा घेऊन आल्या, आणि स्नेहलच्या हातात दिली व समोरच्याच खुर्ची वर बसली
‘बाबा आज कॉलेज मधून यायला उशीर का झाला माहितीय’ चिवडा खात स्नेहल म्हणाली
‘उशीर झाला म्हणून आईचं काळीज तळमळते आणि उशीर का झाला म्हणून बाबांना सांगतेय’ सविता म्हणाली
‘बरं तुला सांगतेय ऐक, आमच्या कॉलेज मध्ये एक मुलगा आहे, तो भरपूर दिवसापासून माझ्या मागे होता, आणि आज तर त्याने कहर केला, कॉलेज सुटलं आणि मी मैत्रींणी बरोबर जात असताना त्याने माझा हात धरला, मला असा राग आला मी उलट्या हाताची एक कानशिलात लगावून दिली’ स्नेहल हातवारे करून दाखवत म्हणाली
‘छान केलंस बेटा’ रमेश कौतुक करत म्हणाले
‘काय छान केलं, आणि त्याने रागाच्या भरात काही केलं तर’ सविता काळजीच्या सुरात म्हणाली
‘तसं काहीचं करणार नाही, कारण तो इतका घाबरून गेला कि तो तिथून निघून गेला, माझ्यापेक्षा तोच जास्त घाबलेला होता’ चिवडा खात स्नेहल म्हणाली
सविताने रमेश यांना खुणावलं, ते स्नेहलने पाहिलं
‘आता नवीन काय, नाही म्हणजे आई काय खुणावून सांगतेय’ स्नेहल म्हणाली
‘तसं काही विशेष नाही, पण मला तुझ्याशी बोलायचं होत’ रमेश यांनी विषयाला सुरुवात करत म्हणाले
‘बोला ना बाबा’ चिवडा खात म्हणाली
‘हे बरं आहे, मी काही बोलायला जाणार तर अडवते, आणि बाबांना लगेज बोलायला सांगते’ फणकाऱ्याने सविता म्हणाल्या
‘अगं आई, मी जरी तुला अडवलं तरी, तू काही बोलायची थांबणार आहेस का’ हसतच ती म्हणाली
‘बघा कशी बोलते ते’ सविता म्हणाली
‘सविता तू थांब गं, स्नेहल बेटा माझा एक मित्र आहे, माधव सरनाईक नाव त्याचं’ असं बोलून त्यांनी स्नेहलचा अंदाज घेत करत म्हणाले
‘बरं पुढे’ स्नेहल चिवडा खात म्हणाली
‘त्यांना पवन नावाचा मुलगा आहे’ रमेश म्हणाले
‘मग मी काय करू’ ती चिवडा खात बाबांचं म्हणण ऐकत होती
‘ते तुला उद्या भेटायला येणार आहेत’ बाबा असं म्हणताच तिला ठसका लागला, तेंव्हा सविताने समोरचा पाण्याचा ग्लास उचलून तिला दिला, ती पाणी पीत असताना रमेश तिच्या पाठीवर हळूच थोपटलं
पाणी पिऊन झाल्यावर चकित होवून स्नेहलने त्यांच्याकडे पहिले
‘बाबा आता तुम्ही सुद्धा’ स्नेहल म्हणाली
‘आधी मी काय सांगतो ते निट ऐक, बघण्याचा कार्यक्रम करायला काहीच हरकत नाही, तुला जर तो मुलगा आवडला नाहीतर तू नकार देऊ शकते, दुसरं तुझ्या ज्या काही अटी आहेत त्या मी त्यांना सांगितल्या आहेत, त्या बद्दल त्यांची काहीच हरकत नाही, आणि हो म्हणायचं कि नाही हे सर्वस्वी अधिकार तुझाच राहील’ रमेश तिच्याकडे पाहत म्हणाले
‘तुम्ही असं काय म्हणता’ सविता रागातच म्हणाल्या ‘जर हिला लग्नचं करायचं नसेल तर मुलगा कितीही चांगला असला तरी ती नकारच देणार’
‘सविता थांब गं, मी बोलतोय ना तिच्याशी, स्नेहल मला वाटतं कि उद्याचा कार्यक्रम करायला काहीच हरकत नाही, दुसरं म्हणजे तुझ्या मनाविरुद्ध काहीच होणार नाही, हा फक्त तू मनापासून निर्णय घे’ रमेश म्हणाले
‘ठीक आहे बाबा, आता तुम्ही म्हणता म्हणून तयार आहे, पण निर्णय माझाच राहील’ स्नेहल म्हणाली
‘हो तुझाच राहील, ते उद्या सकाळी दहा वाजता येणार आहेत, तरी तू दहा वाजता तयार हो’ रमेश म्हणाले
‘हो बाबा’ असं म्हणून ती उठून तिच्या रूम मध्ये निघून गेली
रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती, रमेश डायनिंग टेबलावर येऊन बसले, स्नेहल आली नव्हती,
‘स्नेहल कुठे आहे’ खुर्चीत बसत रमेश म्हणाले
‘तिच्या रूम मध्ये, अभ्यास करतेय’ जेवण वाढत सविता म्हणाली
‘स्नेहल जेवायला ये’ रमेश स्नेहलच्या रुमच्या दिशेने पाहत हाक मारली
‘आली, शेवटचा चॅप्टर सोडवून येते’ आतूनच ती बोलली
सविता ताट वाढत होती, थोड्या वेळातच स्नेहल बाहेर आली, स्नेहल बघण्याच्या कार्यक्रमाला तयार झाली होती म्हणून सविता खूप खुश होत्या
‘चल लवकर वाढ, खुप भूक लागली आहे’ स्नेहल खुर्चीत बसत म्हणाली
तिघांनी जेवायला सुरुवात केली
‘बाबा आज आईचे मौन व्रत आहे का’ स्नेहल हळूच हसत म्हणाली
‘मला हि तसचं वाटत’ तेही हसत म्हणाले
‘कळतात बरं तुमचे टोमणे’ त्यांच्याकडे पाहत सविता म्हणाली
‘आई अगं मस्करी करतोय गं, खरं सांगू का, जेवताना तू बोलली नाहीस कि जेवल्यासारखे वाटतच नाही’ हळूच हसत स्नेहल म्हणाली
‘उद्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला कि झालं’ सविता म्हणाली
‘अगं सविता त्याची काळजी कशाला करतेय, ते उद्याचं उद्या पाहू’ रमेश म्हणाले
हसत खेळत जेवण झालं, भांडी घासताना सावितांच्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता, बाबांचं मन राखण्यासाठी स्नेहल मुलगा पाहायला तयार झाली, पण तीला पुढे शिकायचं आहे म्हणून ती त्या मुलाला नक्कीच नकार देणार, मुलीने जरूर शिकावं, पण तिथपर्यंतच ना जिथपर्यंत लग्नाच वय होत नाही, शेवटी चूल आणि मुलच सांभाळायचं आहे ना.
उद्याची सकाळ उजाडली, सविताने सकाळीच सगळी तयारी करून ठेवली, कांदा पोहे, चहा तयार ठेवले होते, स्नेहल उठली का ते बघायला किचनच्या बाहेर आल्या.
भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं
‘अहो पाहुणे यायची वेळ होतं आली आणि तुम्ही पेपर वाचत बसलेत’ सविता हॉल मधला पसारा आवरत सविता म्हणाली
‘अग आताशी कुठे नऊ वाजत आलेत, म्हणून पेपर वाचतोय, अगोदर स्नेहल उठली का ते बघ आणि तिला तयार व्हायला सांग’ रमेश म्हणाले
सविता स्नेहलच्या रूम जवळ गेली, दरवाजा बंद होता, त्यांनी दरवाजा ठोठावला, काही वेळाने स्नेहलने दरवाजा उघडला
‘हे काय अजून तयार नाहीस, पाहुणे येण्याची वेळ होत आली’ सविता तिच्याकडे पाहत म्हणाली
‘होते गं, काल उशिरा पर्यंत अभ्यास करत होती’ डोळे चोळत स्नेहल म्हणाली
‘अभ्यास अभ्यास अभ्यास, एके दिवशी नाही केला असता तर काय होणार होतं का, जा लवकर तयार हो’ सविता म्हणाली
‘तू बोलायची थांबलीस तर तयारी करीन ना’ स्नेहल म्हणाली
‘लवकर तयार हो आणि बाहेर ये’ किचन मध्ये जात सविता म्हणाली
बरोबर दहा वाजता तयार होऊन सर्वजण पाहुण्यांची वाट पाहत बसले होते
सावितांची बेचैनी वाढत होती, स्नेहल काय करणार हा विचार कालपासून सतावत होता, तिने स्नेहल कडे पाहिलं, तिच्या चेहऱ्यावर कोणतेच टेन्शन नव्हते
‘काय हो ते नक्की आजच येणार आहेत ना’ सविता म्हणाली
‘हो गं, येतील इतक्यात’ दारात जाता रमेश म्हणाले
तेव्हढ्यात पोर्च मध्ये गाडी थांबल्याचा आवाज आला
‘बघ, आले वाटतं’ असं म्हणून ते बाहेर आले, सविता स्नेहलला घेऊन आत गेल्या
गाडीतून माधव सरनाईक, त्यांची पत्नी व मुलगा पवन उतरले,
‘या या, तुमचीच वाट पाहत होतो’ दारात त्यांचे स्वागत करत रमेश म्हणाले
‘रमेश उशीर तर नाही ना झाला’ पायरी चढत माधव म्हणाले
‘अरे नाही रे, ये आत ये, या या तुम्ही पण या’ त्यांना आत घेऊन येत रमेश म्हणाले
सर्वजण आत आले
‘सविता बाहेर ये’ सविताच्या रूमकडे पाहत रमेश म्हणाले ‘तुम्ही बसा’
सविता बाहेर आली, तिने मुलाकडे पाहिले, पवन खूप सुंदर होता, स्नेहलला अनुरूप असा होता, हाच आपला जावई व्हायलाचं पाहिजे असं तिला वाटत होतं पण सर्वकाही स्नेहलच्या होकारावर होत.
‘ये सविता’ किचन मधून सविला येताना पाहून रमेश म्हणाले ‘वहिनी हि माझी पत्नी सविता’
‘आणि सवितावहिनी मी माधव सरनाईक, हि माझी पत्नी विशाखा, आणि हा माझा मुलगा पवन’ माधव म्हणाले
सविताने हात जोडून नमस्कार केला
‘तुम्ही बसा, मी आलेच’ सविता आत गेल्या
काही वेळातच पाण्याच्या ग्लासचा ट्रे घेऊन बाहेर आल्या
बाहेर मित्रांमध्ये ऑफिसच्या गप्पागोष्टी चालू होत्या
‘अहो ते आपल्याकडे मुलीला पाहायला आलेत आणि तुम्ही ऑफिसच्या गप्पा चालू केल्या’ हसत तिने पाण्याचा ट्रे टेबलावर ठेवत म्हणाल्या
रमेश यांनी ग्लास उचलून माधव यांना दिला,
‘सॉरी, कामामुळे जास्त भेट होत नाही म्हणून गप्पा रंगल्या, सविता स्नेहलला घेऊन ये’ रमेश म्हणाले
‘हो हो आता आणते’ असं म्हणून सविता स्नेहलच्या रुममध्ये गेली
स्नेहल तयार होऊन बसली होती,
‘स्नेहल मुलगा खूप सुंदर आहे, त्यांच्या वागण्यावरून ते चांगल्या घरातले आहेत आणि त्यात ते यांचे मित्र आहेत’ खूष होऊन सविता म्हणाली
‘मग मी काय करू, डोळे झाकून होकार देऊ का?’ जरा वैतागत स्नेहल म्हणाली
‘तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, आता बाहेर जाताना अशी वैतागलेली दिसू नकोस, चलं’ सविता तिला घेऊन बाहेर आली
सविताने तिच्या हातात कांद्या पोह्याचा ट्रे दिला, तिला घेऊन बाहेर आल्या
त्यांना येताना पाहून रमेश जागेवरून उठले व स्नेहलला घेऊन पुढे आले
‘माधव हि आमची स्नेहल, सध्या ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे’ रमेश म्हणाले
तिघांनीही तिच्याकडे पहिले, स्नेहल मान खाली घालून उभी होती, मुलगी कितीही बिनधास्त असली तरी अश्या काही क्षणाला लाज हा प्रकार नैसर्गिकपणे येतोच,
‘रमेश साहेब, तुझी मुलगी खूप सुंदर आहे, आम्हाला अशीच सुनबाई हवी होती’ विशाखांनी असं म्हणून तिला घेऊन स्वतःच्या बाजूला बसवलं, पवन हि तिच्याकडेचं पाहतचं राहिला होता, मोबाईल मध्ये पाहिलेला फोटो आणि प्रत्यक्षात समोर दिसत असलेली स्नेहल अधिकचं सुंदर दिसत होती,
सविताने स्नेहलला डिश देण्याविषयी खुणावलं, तसे तिने एकेक डिश देत पाया पडत होती, ते संस्कार पाहून सरनाईक कुटुंब आणखीनच इंप्रेस झाले होते, स्नेहल जेंव्हा पवनला डिश देण्यासाठी गेली, तेंव्हा तिने हळूच त्याच्याकडे पहिले, आई म्हणत होती ते खरं होत, खरचं पवन खूपच सुंदर होता, त्याचं व्यक्तिमत्व दुसरऱ्यावर छाप पाडणार होतं, खरं म्हणजे मनाच्या कोपऱ्यात त्याच्याविषयी एक वेगळीच भावना निर्माण झाली होती, पण त्याचवेळी तिच्या समोर शिक्षणाची इच्छा उभी राहिली,
स्नेहलने डिश दिल्यावर ती जागेवर येऊन बसली,
‘हे बघ स्नेहल, मी जरी तुला सुनबाई म्हणून स्वीकारलं तरी, मला सासूबाई, यांना सासरे आणि पवनला आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारायचा कि नाही हा सर्वस्वी तुझाच निर्णय राहील, बाकी आमच्या पवनला तू आवडलेली दिसतेय’ विशाखांनी डिश टेबलावर ठेवली व तिचा हात हातात घेत म्हणाल्या
‘हो स्नेहल, मी रमेशचा मित्र आहे म्हणून म्हणतो, मनात नाराजी ठेऊन किंवा जबरदस्ती होकार मिळवून संसार चांगला होत नाही, बाकी तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे, काय रमेश’ माधव म्हणाले
‘बरोबर बोलतो माधवा, तुम्ही येण्याच्या आधी तिला तेच सांगितलं कि तुझ्या निर्णयाच्या बाहेर आम्ही नाही’ रमेश म्हणाले
स्नेहल त्यांचे सर्व बोलणं ती ऐकत होती, तिच्या मनाची चलबिचल चालू होती, पवन सारखा मुलगा आपला आयुष्याचा जोडीदार म्हणून अनुरूप आहे, पण एकदा का संसारात गुरफटलो कि, शिक्षणाची वाट हळू हळू दूर होत जाते, आणि संसार, चूल, मुल यातच आयुष्य निघून जातं व करिअर तिथेच थांबलं जातं.
ती काहीतरी विचार करतेय हे पवनने बरोबर ओळखलं होत, पण होकार कि नकार याचा अंदाज येत नव्हता
‘रमेश काका’ पवन असं म्हणताच स्नेहल विचारातून बाहेर आली
‘हां पवन बोल’ रमेश म्हणाले
‘मला तुम्हाला एक विनंती करायची होती व परवानगीची गरज होती’ पवन म्हणाला
‘विनंती आणि परवानगी? ती कशाबाबत?’ रमेश प्रश्नाथर्क नजरेने पाहत म्हणाले
‘काका, तुमची मुलगी कोणत्यातरी कोड्यात पडली आहे, त्यासाठी मी तिला बाहेर भेटायला पाहिजे असं मला वाटतं, अर्थात स्नेहलची मर्जी असेल तर’ पवनने स्नेहल कडे पाहत म्हणाली, तिनेही त्याच्याकडे पाहिले
‘बेटा माझी काहीच हरकत नाही’ रमेश यांनी स्नेहल कडे पाहिलं ‘स्नेहल तुझं काय म्हणणं आहे’
स्नेहलने रमेश व सविताकडे पहिले, आणि नकळत होकार दिला
‘पवन बेटा, तिने तसा होकार दिलाय’ रमेश म्हणाले
‘मग ठीक आहे, मी प्लाझाच्या बाजूला असलेल्या एका कॅफेत बारा ते एक वाजेपर्यंत वाट पाहतो, आणि हो स्नेहल, या भेटीत लग्न विषय नसून फक्त मैत्री नात्याने भेटू या’ पवन जागेवरून उठत म्हणाला
तेंव्हा सगळेच उठून उभे राहिले,
‘रमेश, आपण त्यांच्या निर्णयाची वाट पाहू या कसं’ माधव म्हणाले
‘हो माधव’ रमेश म्हणाले
‘मग आम्ही निघतो आता’ असं म्हणून सगळ्यांनी एकमेकांना हात जोडत निरोप घेतला, रमेश, सविता हे दोघेही माधव आणि विशाखा यांना सोडायला दारापर्यंत बाहेर आले,
पवन हि बाहेर जात असताना तो काही क्षण थांबला, मागून येणाऱ्या स्नेहल कडे पहिले
‘स्नेहल, तू येणार कि नाही हे माहित नाही पण एक नक्की बोलतो तेही मनापासून’ पवन असं म्हणताच तिने त्याच्याकडे पहिले, त्याने तिच्या डोळ्यात पहिले आणि तो हळूच म्हणाला ‘आय लव्ह यु’
असं बोलून तो पटकन बाहेर निघून गेला,
तसे कॉलेज मध्ये असे ‘आय लव्ह यु’ बोलणारी मुले भरपूर पहिली होती पण आपल्याच घरात आपल्याला ‘आय लव्ह यु’ बोलणारा ती पाहत होती,
ती चकित होती आणि अवाक ही होती
‘आय लव्ह यु’ बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसला होता, आणि आपण काहीच बोललो नाही, हाच तो क्षण का, मनात तरंग उठतात जे आता आपल्या मनात उठत आहेत, तसाच विचार करत ती तशीच उभी होती
रमेश आणि सविता त्यांना सोडून आत आले,
‘अहो मुलगा किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ना’ सविता म्हणाली
‘हो ना म्हणून तर हे स्थळं मी सुचवलं’ रमेश म्हणाले
ते बोलत येत असताना त्यांनी स्नेहलला पुतळ्यासारखी उभी असलेली पाहून सविताने रमेश यांच्याकडे पहिले,
‘आता हिला काय झालं’ रमेश सविताकडे पाहत म्हणाले
‘ये स्नेहल, अशी का उभी तू’ तिला हलवत सविता म्हणाली
ती भानावर आली, ‘काय झालं अशी का उभी’
‘काही नाही आई, पण मी भेटायला जाणं बरोबर आहे का’ स्नेहल म्हणाली
‘बेटा, तो मैत्री या नात्याने म्हणाला ना, एकदा भेट, नंतर तूच ठरवं’ रमेश तिला समजावत म्हणाले
‘तुम्ही काय एकसारखे तुझा निर्णय, तुझा निर्णय बोलता आहात’ जरा रागातच सविता म्हणाल्या आणि टेबलावरच्या डिश ट्रे मध्ये ठेवत आत निघून गेली आणि बाहेर येऊन खुर्चीत बसली
तिला सोबत घेऊन रमेश कोचावर बसले
‘स्नेहल कसा वाटला पवन’ रमेश म्हणाले
ती काहीच बोलली नाही
‘अगं बाबा काय बोलतायत’ सविता म्हणाली
‘बाबा तुम्हाला माहितीय ना, मला अजून पुढे खूप शिकायचं आहे’ स्नेहल म्हणाली
‘आय नो बेटा, तू शिक पण आज पवनला भेटणार आहेस ना, जाणार नसेल तर मी त्याला फोन करून कळवतो, बिच्चारा वाट बघत बसायचा’ रमेश म्हणाले
‘नाही नको, मी एकदा त्याला भेटते मग मी काय ते सांगेन’ स्नेहल म्हणाली
‘तुम्हाला मी आधीच सांगते, पवन सारखं स्थळ, तिच्या शिक्षणासाठी घालवाल तर मी तुमच्याशी आणि तिच्याशी अजिबात बोलणार नाही’ टेबल साफ करत सविता म्हणाली
सविता जे काही बोलते त्यात काहीच गैर नाही, पवन होताच तसा, कोणत्याही मुलीने डोळे बंद करून पसंद करावं, कोणत्याही मुलीशी तिच्या मनाविरुद्ध लग्न करून तिच्या इछा, आकांशा या कशाला मारायच्या, रमेश हे द्विधा मनस्थितीत होते, एकीकडे मुलगी आणि दुसरी कडे पवन सारखा मुलगा,
काहीवेळाने स्नेहल तयार होऊन बाहेर आली,
‘बाबा, मी पवनला भेटून येते’ ड्रेस सारखा करत mhanali
‘ये, तू जो काही निर्णय घेशील तो योग्यच असेल’ रमेश म्हणाले
‘असचं बोलून तिला डोक्यावर चढवा’ सविता त्राग्याने म्हणाल्या
‘आई तुला फक्त माझं लग्नचं दिसत, पण माझी करिअर दिसत नाही’ स्नेहल बॅग घेत वैतागत म्हणाली
‘करिअर करून काय करणार, शेवटी अक्कल चुलीतच घालायची आहे ना’ सविता म्हणाली
‘सविता, अगं आजकाल मुलीही चांगल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत’ रमेश म्हणाले
‘नाव कमावतात? लग्न झाल्यावर कमवा म्हणे, नाहीतर वय होऊन गेलं कि मग विदुरासी नाहीतर घटस्फोटीत माणसाशी करा लग्न’ सविता म्हणाली
‘आई, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, मी जातेच कशी’ स्नेहल म्हणाली
स्नेहल निघून गेली
‘तुम्हाला काय पाहिजे ते करा, मग बघा मी काय करते ते’ असं म्हणून फणकाऱ्याने आत निघून गेली
स्नेहल स्कुटी न घेता कॅब करून प्लाझाला आली
तिने आजूबाजूला पहिले, एक कॅफे दिसला, बहुतेक हाच असावा, तिने घड्याळात पाहिले, सव्वा बारा वाजून गेले होते, ती कॅफे जवळ आली, दरवाजा उघडून आत जाणार तेव्हढ्यात दरवाजा उघडला गेला, ती थोडी चकितच झाली, समोर पवन दरवाजा उघडून उभा होता, त्याने हातातला पुष्पगुच्छ तिला दिला.
ते अनपेक्षित स्वागत पाहून ती आश्चर्य चकित झाली होती, आजूबाजूची तरुण तरुणी आपल्याकडे पाहताहेत ते पाहून तिला थोडी लाज वाटायला लागली होती, खरं म्हणजे असं कोणा तरुणाला भेटायला जाणं तिची पहिलीच वेळ होती,
पवन स्नेहलला घेऊन टेबलाजवळ आला, तिला बसण्यासाठी त्याने खुर्ची मागे घेतली
‘प्लीज’ असे म्हणून त्याने तिला बसायला सांगितले
त्याच्या वागण्याने ती पावलोपावली चकित होत होती
स्नेहल खुर्चीवर बसल्यावर पवन समोरच्या खुर्चीवर बसला
‘एखाद्या मुलीवर इम्प्रेशन पडण्यासाठी हे नाटक वाटतं असेल ना’ पवन म्हणाला
‘वाटतं , पण सिनेमासारखं वाटतं’ असं म्हणून तीने हळूचं पवनकडे पाहिलं
‘पण या अगोदर कोणासाठीचं केलं नव्हतं, फक्त तुझ्यासाठीचं केलं’ पवन म्हणाला
ती काहीच बोलली नाही,
ती काही बोलेलं याची वाट पाहत होता, पण ती शांतच होती
‘मला आता कळालं कि, मुलीचा बाप मुलीची बाजू घेऊन खोटं का बोलतात ते’ गालात हळूच हसत पवन म्हणाला
‘तुम्हाला नक्की काय म्हणायचं’ स्नेहल लटक्या रागाने म्हणाली
‘हेच कि, रमेश काका म्हणाले कि आमची स्नेहल खूप बोलकी आहे’ गालात हसत पवन म्हणाला
‘ते खरचं म्हणाले होते, मी आहेच बोलकी’ स्नेहल म्हणाली
‘मग मघाशी का चूप होतीस’ पवन म्हणाला
‘अरे वा, म्हणजे तुला बोलता येत तर, मला वाटलं रमेश काका खोटं बोलले असं वाटलं’ पवन म्हणाला
‘पवन, तुम्ही असं का म्हणता’ स्नेहल म्हणाला
‘एक मिनिट, मी कोणी वयस्कर दिसतो का’ पवन म्हणाला
‘वयस्कर?’ त्याच्याकडे पाहत स्नेहल म्हणाली
‘नाही म्हणजे, अहो जावो करतेयस म्हणून’ हसत पवन म्हणाला
‘पण पहिल्याच भेटीत असं एकेरी नावाने म्हणणं योग्य नसतं ना’ स्नेहल म्हणाली
‘पहिल्या भेटीत? बाईसाहेब आपण दुसऱ्यांदा भेटत आहोत ना’ पवन म्हणाला
‘दुसऱ्यांदा?’ स्नेहल प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली
‘हो, पहिल्यांदा, आज सकाळी तुझ्या घरी, आणि आता’ पवन म्हणाला
तो असं बोलल्यावर ती हसली
‘अरे वा, म्हणजे हसता पण येतं तर’ तिच्याकडे पाहत पवन म्हणाला
‘आता तर तुम्ही……’ थोडी लाजत स्नेहल म्हणाली
‘परत तेच, स्नेहल आपण समवयस्क आहोत आणि मैत्री करण्यासाठी भेटतोय ना’ पवन म्हणाला
‘सॉरी, तर तू………..’ स्नेहल त्याच्याकडे पाहत म्हणाली
‘तर काय?” तिच्याकडे पाहत पवन म्हणाला
‘काही नाही’ असं म्हणून ती शांत बसली
‘बोल ना, मी ऐकायला आतुर आहे’ पवन म्हणाला
‘काही नाही, तु रोमान्स करण्याच्या पध्दतीने बोलतोय’ स्नेहल म्हणाली
‘वाटतं ना, पण काय आहे स्नेहलं, पाऊस पडल्यावर चातकाने पाणी प्यावे, वसंत ऋतू आल्यावर कोकिळेने कुहू कुहू करावे, हा तर निसर्गाचा नियम आहे’ पवन म्हणाला
‘अरे वा, एमबीए केलेला माणूस अशी साहित्यिक भाषा बोलू शकतो’ स्नेहल म्हणाली
‘असं काही नसतं, पण पाण्यात पडल्यावर माणूस पोहतो ना तसाच प्रेमात पडल्यावर अश्या भाषा बोलायला लागतो’ पवन म्हणाला
‘तुझ्याशी बोलायचं म्हणजे ………’ स्नेहल अचानक बोलता बोलता थांबली
‘म्हणजे काय?’ पवन म्हणाला
‘काही नाही’ ती हळूच हसत म्हणाली
‘तुमच्या मुलींचा आणि बायकांच असचं असत अर्धवट ठेऊन बोलायचं’ पवन म्हणाला
‘बराच अनुभव आहे तुला, मुलींचा आणि बायकांचा’ थोड्या चिडक्या स्वरात स्नेहल म्हणाली
‘अनुभव नाही, पण थोरामोठ्यांच्या बोलण्यातून कळालं, खरं म्हणजे माझा यावर विश्वास नव्हता, कारण मी तसा अनुभव घेतला नव्हता, पण आता घेतला’ पवन म्हणाला
स्नेहल काहीच बोलली नाही,
‘कसं आहे स्नेहल, मी आतापर्यंत कोणत्याच मुलीला ‘आय लव्ह यु’ असं म्हणालो नव्हतो, जे आज तुला पाहिल्यावर हृदयातून आपोआप निघालं, फक्त प्रतिसादावर अवलंबून आहे’ पवन म्हणाला
‘तुमच्याकडे, पाहुण्यांना कॉफी विचारायची पध्दत नाही वाटतं’ विषय बदलत स्नेहल म्हणाली
‘वोह, सॉरी’ त्याने अजूनपर्यंत कॉफी मागवली नाही हे लक्षात आल्याने त्याची चूक त्याला कळाली होती, म्हणून त्याने कॉफीची ऑर्डर दिली,
तो गोंधळलेला पाहून स्नेहलला हसू येत होत
‘यात हसायला पाहिजे असं काही नाही, होते प्रेमात चूक’ पवन म्हणाला
‘चूक?’ ती अजूनच हसत म्हणाली
‘हो प्रेमात पडल्यावर आजूबाजूचा विसर पडतो’ पवन म्हणाला
‘प्रेमात, कोणाच्या?’ स्नेहल हसू लपवतं म्हणाली
‘स्नेहल, माझ्या आयुष्यात पहिलचं आणि शेवटचं प्रेम तुझ्यावरचं केलंय’ पवन म्हणाला
ती काहीच बोलली नाही
‘स्नेहल मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय’ पवन म्हणाला
ती काहीच बोलली नाही,
‘स्नेहल, तू लग्नासाठी तयार नाही हे कळतं, पण त्याचं कारण कळेल का?’ आता जरा सिरीयस होत पवन म्हणाला
‘पवन, मला लास्ट इयर झाल्यावर पुढचं शिक्षण करून करिअर करायचं आहे, म्हणून आता लग्न करायचं नाही अस मी ठरवलंय’ स्नेहल ही थोडी गंभीर होत म्हणाली
‘ती करिअर लग्नानंतरही करता येते ना’ पवन म्हणाला
‘मला नाही तसं वाटतं’ स्नेहल म्हणाली
‘असं कोणी सांगितलं’ पवन म्हणाला
‘पवन लग्न झालं कि संसार सुरु झाला, मग चूल आणि मुलं मागे लागतं आणि करिअर त्यातच कुठेतरी हरवून जातं’ स्नेहल म्हणाली
‘ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास आहे का?’ पवन म्हणाला
तो असं म्हणताच तिने त्याच्याकडे पाहिलं,
‘आहे पण का?’ स्नेहल म्हणाली
‘आपल्याला एके ठिकाणी जायचंय, तू येशील’ पवन म्हणाला
‘कुठे?’ तीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले
‘माझ्यावर विश्वास असेल तर, तू चल’ पवन म्हणाला
आता तिला जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं, तिने मानेनेच होकार दिला
कॉफी पिऊन झाल्यावर पवनने कॉफीच बिलं दिलं व तिला घेऊन कॅफेच्या बाहेर आला,
समोरच त्याची बाईक उभी होती,
त्याने बाईक सुरु केली, आणि तिला बसायला सांगितलं,
ती पहिल्याच वेळेला कोणाच्या तरी मागे बसून बाईकवर जात होती, म्हणून ती जरा अंग चोरून बसली,
बाईक माहीमच्या दिशेने जात होती, पवन आपल्याला कुठे घेऊन जातोय हाच प्रश्न तिला पडला होता
काही वेळाने त्याने त्याची बाईक एका कॉम्प्लेक्स मध्ये आणली व पार्क केली
‘चल स्नेहल’ पवन म्हणाला
‘अरे पण आपण कुठे चाललोय’ स्नेहल म्हणाली
‘चल तर, तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील’ पवन म्हणाला
ती त्याच्या बरोबर आत गेली, लिफ्ट मधून ते पाचव्या मा
लेखक – नितिन पाटील,
ठाणे
Leave a Reply